Ranveer Singh's Alleged Love Affairs Before Deepika Padukone | दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार
दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार

बीटाऊनमध्ये हिरो-हिरोईनशी एकमेकांशी नाव जोडली जाणं हा काही नवा प्रकार नाही.  एकत्र सिनेमा करताना तर हा प्रकार नेहमीच होता. 2013मध्ये आलेल्या लुटेरे सिनेमाच्यावेळी रणवीर आणि सोनाक्षीचे अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला नाही मात्र प्रेक्षकांना ही जोडी पसंतीस उतरली. दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली. पण मीडिया रिपोर्टनुसार दोघांच्या प्रेमामध्ये सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आले. रणवीरने देखील आपण दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले.


मीडिया रिपोर्टनुसार लुटेरे सिनेमाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली. मात्र शत्रुघ्न सिन्हा याने हे नातं पसंत नसल्याने सोनाक्षी आणि रणवीरने आपले मार्ग बदलले. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सोनाक्षी दबंग 3 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात  सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे.  सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Ranveer Singh's Alleged Love Affairs Before Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.