ठळक मुद्देरणवीरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.

दरदिवशी कुण्या ना कुण्या सेलिब्रिटीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता. अनेकदा या फोटोतील सेलिब्रिटीला ओळखणेही कठीण जाते. सध्या असाच एक फाटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे, रणवीर सिंगचा. या फोटोत रणवीरसोबत त्याची मैत्रिण आणि व्हीजे पिया त्रिवेदी दिसतेय. 
पिया व रणवीर कॉलेज फ्रेन्ड आहेत. रणवीरच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त पियाने आपल्या कॉलेज अल्बमधील काही फोटो शेअर केले होते. या फोटोतील रणवीर क्लिन शेवमध्ये दिसतोय. त्याचे केस वाढलेले आहेत. रणवीर व पियाचा हा फोटो अनेकांनी पाहिला. पण यापैकी काहींनी या फोटोवरून रणवीरला ट्रोल करणे सुरु केले. काहींना हा फोटो पाहिल्यानंतर धोनी आठवला तर काहींना फराह खान. 


हा तर फराह खानसारखा दिसतोय, असे या फोटोवर कमेंट करताना काहींनी लिहिलीय.  तर काहींनी ही दुसरी मुलगी कोण? असा सवाल करत या फोटोतील रणवीरची मजा घेतली आहे. काहींनी या फोटोत दीपिका पादुकोणला टॅग करण्याची मागणी केली आहे. दीपिका, हा बघ तुझा नवरा, असे काहींनी टिंगल करत लिहिले आहे.  

रणवीरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो ‘83’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका  साकारणार आहे.  

रणवीर सिंगसोबतदीपिका पादुकोणही या चित्रपटात दिसणार आहे. लग्नानंतर त्यांचा एकत्र असा  हा पहिला चित्रपट असणार आहे. अलीकडे रणवीरने या चित्रपटात फर्स्ट लूक शेअर केला होता. त्याला लोकांचा जबदस्त रिस्पॉन्स मिळाला होता.


Web Title: ranveer singh trolled over his throwback photos with collage friend and model pia trivedi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.