ठळक मुद्देएका व्हिडिओमध्ये रणवीर सिंग क्रिकेटमधील दिग्गज मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर सिंग संदू यांच्यासोबत नशे से चढ गई या गाण्यावर ताल धरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं. आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ८३ नावाचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. सध्या विश्वविजेत्या क्रिकेट टीममधील दिग्गज ८३ या चित्रपटामधील कलाकारांना क्रिकेटचे प्रशिक्षण धर्मशाला येथे देत आहेत.

१९८३ वर्ल्डकप विजेते कॅप्टन कपिल देव आणि त्यांची टीम रणवीर आणि संपूर्ण टीमला क्रिकेटमधील बारकावे शिकवत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो रणवीर सिंगने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासोबतच १९८३च्या वर्ल्डकपच्या आठवणी देखील ते चित्रपटाच्या टीमसोबत शेअर करत आहेत. या कॅम्पचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 83 चिॆत्रपटाच्या टीममधील सदस्यांनी ब्लू रंगाची जर्सी घातलेली असून 83 चे दिग्गज त्यांना क्रिकेटचे धडे देत आहेत असा एक फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. 

रणवीरने या कॅम्पमधील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणने खूप छान रिप्लाय दिला आहे. तिने म्हटले आहे की, हे क्षण पुन्हा परत येणार नाहीत... त्यामुळे हे चांगल्याप्रकारे एन्जॉय कर... मला तुझा अभिमान वाटतो.

धर्मशाला क्रिकेट स्टेडियमला सुरू असलेल्या या कॅम्पचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येत की, 83 चित्रपटाची टीम क्रिकेटर्स कडून क्रिकेटचे धडे घेण्यापासूनच त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती देखील करत आहेत. एका व्हिडिओत रणवीर सिंग अल्ताफ राजाचे प्रसिद्ध गाणे तुम तो ठहरे परदेसी हे गाताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत अपना टाइम आयेगा या गली बॉयमधील गाण्यावर तो थिरकत आहे. 

एवढेच नव्हे तर एका व्हिडिओमध्ये रणवीर सिंग क्रिकेटमधील दिग्गज मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर सिंग संदू यांच्यासोबत नशे से चढ गई या गाण्यावर ताल धरत असल्याचे पाहायला मिळत आहे.


Web Title: Ranveer Singh Shakes Leg on 'Nashe Si Chadh Gayi' With Cricketers, Sings 'Apna Time' With '83 Cast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.