love In The Air : रणवीरने आपल्या लेडीलव्हचा तो व्हिडीओ केला इन्स्टावर शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:50 PM2019-08-16T18:50:31+5:302019-08-16T18:54:50+5:30

अभिनेता रणवीर सिंग पत्नी दीपिका पादुकोणवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांचं एकमेकांवरील प्रेम जगजाहीर आहे.

Ranveer singh lovely post for wife deepika padukone on instagram stories | love In The Air : रणवीरने आपल्या लेडीलव्हचा तो व्हिडीओ केला इन्स्टावर शेअर

love In The Air : रणवीरने आपल्या लेडीलव्हचा तो व्हिडीओ केला इन्स्टावर शेअर

googlenewsNext

अभिनेता रणवीर सिंग पत्नी दीपिका पादुकोणवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांचं एकमेकांवरील प्रेम जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील हे हॉट कपल सोशल मीडियावरसुद्धा एकमेकांवरील बिनधास्तपणे व्यक्त करत असतात. रणवीरने सोशल मीडियावर आपल्या लेडी लव्हसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एत जिफ व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हि़डीओत दीपिाक ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. 

सध्या रणवीर आणि दीपिका लंडनमध्ये आहेत. दोघे तिथे  ८३ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात काम करण्याविषयी तिने सांगितले होते की, '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय दुसरा कुणी अभिनेता साकारत असता तरी देखील मी या चित्रपटात काम केले असते. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. 


दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे.यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

विक्रांत आणि दीपिकाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हा सिनेमा १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ranveer singh lovely post for wife deepika padukone on instagram stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.