ठळक मुद्देशाहरुख खान 'डॉन3' मधून बाहेर झाला आहेनिर्माते शाहरुखच्या जागी रणवीर सिंगला घेण्याचा विचार करतायेत

गतवर्षी आलेला शाहरुख खानचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला त्यानंतर शाहरुख आपल्या सिनेमांना घेऊन खूपच सिलेक्टिव्ह झाला आहे. राकेश शर्मांच्या बायोपिकमधून त्यांने हात काढून घेतला. आता अशी माहिती मिळतेय की, शाहरुख खान 'डॉन3' मधून बाहेर झाला आहे. निर्माते शाहरुखच्या जागी रणवीर सिंगला घेण्याचा विचार करतायेत.  

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखने काही वैयक्तिक कारणांमुळे डॉन 3 सोडून दिला आहे. त्यामुळे जोया अख्तर सध्या या सिनेमासाठी दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात आहे. जोया अख्तर या सिनेमासाठी रणवीर सिंगच्या नावाचा विचार करतेय. दोघांमध्ये या संदर्भात बोलणं देखील सुरु आहे. रणवीर सिंगने जोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली दोनदा काम केले आहे. तर अभिनेत्रीच्या नावासाठी कॅटरिना कैफचा विचार करतेय. कॅटने जोयासोबत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये काम केले आहे.    


2006मध्ये डॉनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात शाहरुख आणि प्रियंका चोप्राची जोडी होती. तर करिनाचा कॅमिओ होता. त्यानंतर 2011 मध्ये आलेल्या डॉन 2 मध्ये पुन्हा प्रियंका-शाहरुख दिसले होते. मात्र डॉन3 शाहरुखने सोडला आहे. त्यामुळे मेकर्स आता नव्या हिरोच्या शोधात आहेत. 

दुसरीकडे रणवीर सिंग सध्या ८३च्या तयारीला लागला आहे. धर्मशालामध्ये ८३ची टीम क्रिकेटचे धडे गिरवतेय. बूट कॅम्पचे प्रशिक्षण संपल्यानंतर ते शूटिंगसाठी रवाना होणार आहेत. यानंतर '८३'ची टीम लंडनसाठी 15 मे रोजी रवाना होणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  


Web Title: Ranveer singh is going to replace shah rukh khan in don 3 after king khan walkout
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.