हा रानू मंडलचा मुलगा तर नाही? सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ, आवाज ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:29 AM2019-09-06T10:29:06+5:302019-09-06T10:45:11+5:30

हा तरूण रानू मंडलचा मुलगा असल्याचा दावा केला जात आहे. असे यासाठी की, रानू मंडलप्रमाणेच त्याच्या आवाजातही एक वेगळी जादू आहे.

ranu mandal son singing song video goes viral | हा रानू मंडलचा मुलगा तर नाही? सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ, आवाज ऐकून व्हाल थक्क

हा रानू मंडलचा मुलगा तर नाही? सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ, आवाज ऐकून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देरानू मंडलला लोक लता मंगेशकर यांची कॉपी म्हणत आहेत. तर व्हिडीओतील या मुलाला कुमार शानू यांची.

रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलचा गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि रानू एका रात्रीत स्टार झाली. पाहता पाहता तिने बॉलिवूडसाठी तीन गाणीही रेकॉर्ड केली आणि काहीच दिवसांत कोट्यवधी लोक तिचे फॅन्स बनलेत. इतकेच काय तर रानूबद्दल अप्रत्यक्षणपणे निगेटीव्ह कमेंट करणा-या लता मंगेशकर यांनाही रानूच्या चाहत्यांनी धारेवर धरले. अशात सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा तरूण रानू मंडलचा मुलगा असल्याचा दावा केला जात आहे. असे यासाठी की, रानू मंडलप्रमाणेच त्याच्या आवाजातही एक वेगळी जादू आहे. अर्थात हा व्हायरल झालेला व्हिडीओ खरा आहे की खोटा, याबद्दल कुठलाही दावा आम्ही करत नाही.


अलीकडे एका फेसबुक पेजवर एका अतिशय सामान्य दिसणा-या मुलाचा गातानाचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. भींतीला टेकून उभा असलेला हा मुलगा मंत्रमुग्ध होऊन गात असल्याचे या व्हिडीओत दिसते आहे. हा मुलगा दोन गाणी ऐकवतो. एक ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है’ आणि दुसरे म्हणजे, ‘सोचेंगे तुम्हे प्यार...’. या व्हिडीओला दिलेले कॅप्शन चांगलेच इंटरेस्टिंग आहे. ‘हा रानू मंडलचा मुलगा तर नाही? या हि-यालाही कुणी पैलू पाडणार का? एकदा नक्की ऐका,’असे कॅप्शन या व्हिडीओला दिले गेले आहे.
रानू मंडलला लोक लता मंगेशकर यांची कॉपी म्हणत आहेत. तर व्हिडीओतील या मुलाला कुमार शानू यांची. युट्यूबपासून फेसबुकपर्यंत सगळीकडे या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलाचा नाव, गाव, पत्ता याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळू शकली नाही. आता फक्त रानू दी प्रमाणेच या मुलालाही बॉलिवूड संधी देईल का? हाच एक प्रश्न आहे.

Web Title: ranu mandal son singing song video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.