Rani Mukherjee releases release date for 'Mardani 1' film; Release to be done on 'this' date! | राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज!
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज!

बॉलिवूडची मर्दानी गर्ल अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा पुढचा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. 

यशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचामर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता तर दुसरा भाग गोपी पुथरान हे दिग्दर्शित करतील. मर्दानी २ची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करणार आहे. राणी मुखर्जीने ‘मर्दानी’ चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय हिची भूमिका साकारली होती. एका तरूण मुलीच्या शोधात तिने एक सापळा रचलेला असतो यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. 

English summary :
Mardaani 2 Movie: The release date for the movie Mardani 2 has just been announced. According to an official announcement made by Yash Raj Films, Rani Mukherjee's 'Mardani 2' movie is set to release on December 7.


Web Title: Rani Mukherjee releases release date for 'Mardani 1' film; Release to be done on 'this' date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.