कंगना राणौतची बहीण रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 03:43 PM2020-04-16T15:43:34+5:302020-04-16T15:44:42+5:30

काही दिवसांपूर्वी ट्विटरने दिली होती समज

rangoli chandel made religious comment on farah ali khan twitter suspends her account-ram |  कंगना राणौतची बहीण रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, वाचा काय आहे कारण

 कंगना राणौतची बहीण रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, वाचा काय आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे एका वादग्रस्त पोस्टनंतर ट्विटरने रंगोलीला समज दिली गेली होती. 

वाद ओढवून घेणे ही अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल हिची जुनी सवय. चित्रपटांपासून राजकारणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर ट्विट करून चर्चेत राहणा-या, प्रसंगी वाद ओढवून घेणा-या रंगोलीने आताही असाच वाद ओढवून घेतला. पण यावेळी ट्विटरने कडक कारवाई करत रंगोलीचे ट्विटर अकाऊंटच सस्पेंड केले. आता हा वाद काय, ते जाणून घेऊ यात...

काय आहे प्रकरण
मोराबादमध्ये काही नागरिकांनी आरोग्य अधिका-यांवर दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर रंगोली अशी काही भडकली की, एका विशिष्ट समाजाच्या लोकांना एका रांगेत उभे करून त्यांना गोळ्या घाला, असे काय काय तिने ट्विटरवर लिहिले. तिच्या या ट्विटर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लेखिका व दिग्दर्शिका रीमा कागती, सुजैन खानची बहीण फराह खान अली अशा अनेकांनी रंगोलीच्या या ट्विटवर आक्षेप घेतला. फराह खान अलीने तर रंगोलीच्या अटकेची मागणीही केली. शिवाय ट्विटरकडेही रंगोलीचे अकाऊंट ब्लॉक करण्याची विनंती केली.


फराह खान अलीचे हे ट्विट पाहून रंगोली भडकली आणि तिने फराहवर पलटवार केला. ‘तू मला अरेस्ट करणार? तुझ्या नव-याला दुबईत ड्रग्जसोबत पकडले होते आणि तू मला अरेस्ट करणार?’ असे काय काय रंगोली बरळली. रंगोलीच्या या ट्विटनंतर ट्विटरने रंगोलीचे अकाऊंटवर सस्पेंड केले. ट्विटरने ही कारवाई करताच फराह खान अलीने ट्विटरचे आभार मानले.

काही दिवसांपूर्वी ट्विटरने दिली होती समज
अलीकडे एका वादग्रस्त पोस्टनंतर ट्विटरने रंगोलीला समज दिली गेली होती. अकाऊंट रद्द करण्याचा इशारा तिला देण्यात आला होता. मात्र रंगोलीवर याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट तिने ट्विटरवरच हल्ला चढवला.  केवळ इतकेच नाही तर ट्विटर राष्ट्रविरोधी असल्याचा, प्रामाणिक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही तिने केला. माझे ट्विटर अकाऊंट रद्द केले तरी माझ्याकडे दुसरा पर्याय तयार असल्याचेही ती म्हणाली होती.

Web Title: rangoli chandel made religious comment on farah ali khan twitter suspends her account-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.