ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:38 PM2021-04-29T18:38:39+5:302021-04-29T18:40:00+5:30

Randhir Kapoor has tested positive for the CoronaVirus : कपूर कुटुंबावर आणखी एक संकट; वाचा, रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबद्दल काय म्हणाले डॉक्टर

randhir kapoor has tested positive for the coronavirus and admitted to mumbai kokilaben hospital | ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, रूग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, रूग्णालयात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देऋषी कपूर, राजीव कपूर या भावंडाच्या निधनानंतर रणधीर कपूर पूर्णपणे कोलमडले आहेत. ऋषी आणि राजीव यांच्या निधनामुळे मी पूर्णपणे कोलमडलो होतो असे रणधीर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.

70 व 80 चे दशक गाजवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Randhir Kapoor gets hospitalised for COVID 19 treatment in Mumbai)
  करिना कपूर व करिश्मा कपूर यांचे वडील रणधीर कपूर यांना कोरोना झाल्याची बातमी येताच, त्यांच्या तब्येतीबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू झालेत. यानंतर त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. संतोष शेट्टी यांनी एक ऑफिशिअल स्टेटमेंट जारी केले. 

रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
रणधीर यांच्याआधी कपूर कुटुंबातील नीतू कपूर व रणबीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान दोघांनीही कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रणधीर कपूर काहीच दिवसांपूर्वी पत्नी बबीता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मुलगी करिना कपूरच्या घरी दिसले होते. या पार्टीसाठी करिनाच्या घरी जातानाचे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  रणधीर यांना गाडीतून उतरल्यावर चालण्यासाठी दोन जणांच्या आधाराची गरज घ्यावी लागली होती. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या फॅन्सना प्रचंड वाईट वाटले होते. रणधीर यांनी त्यांची काळजी घ्यावी असे अनेक संदेश त्यांच्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी दिले होते.

ऋषी कपूर, राजीव कपूर या भावंडाच्या निधनानंतर रणधीर कपूर पूर्णपणे कोलमडले आहेत. ऋषी आणि राजीव यांच्या निधनामुळे मी पूर्णपणे कोलमडलो होतो असे रणधीर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. गेल्या काही महिन्यात माझ्या घरातील सदस्यांच्या एकामागे एक झालेल्या निधनामुळे मी संपूर्णपणे कोलमडून गेलो आहे. राजीवला कधीच कोणत्या प्रकारचा आजार नव्हता. राजीव खूपच खेळकर वृत्तीचा होता. तो आता आपल्यात नाही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. आता मी त्या घरात एकटाच शिल्लक राहिलो आहे, असे ते म्हणाले होते़

Web Title: randhir kapoor has tested positive for the coronavirus and admitted to mumbai kokilaben hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.