रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:33 PM2021-05-15T18:33:23+5:302021-05-15T18:34:05+5:30

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे समोर आले होते.

Randhir Kapoor Covid 19 free, discharged from hospital | रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

googlenewsNext

अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रणधीर कपूर यांनी करोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.


ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयातून रजा मिळाल्यानंतर रणधीर कपूर यांनी सांगितले की ‘आता मी घरी आलो आहे. मला बरे वाटत आहे. पुढचे काही दिवस रणधीर कपूर पत्नी बबीता, मुली करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान, जावई सैफ अली खान यांना भेटू शकणार नाहीत. ते म्हणाले की, ‘मला पुढचे काही दिवस सर्वांपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आणखी काही दिवस नंतर मी पुन्हा सगळ्यांना भेटेन.  हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेतलेल्या सर्वांचे रणधीर कपूर यांनी आभारही मानले आहेत.


२९ एप्रिल रोजी ७४ वर्षीय रणधीर कपूर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता रणधीर कपूर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.


रणधीर कपूर यांच्यासोबत त्यांच्या स्टाफमधील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनाही कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशात काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच बरेच कलाकार कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. 

Web Title: Randhir Kapoor Covid 19 free, discharged from hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.