याला तुरूंगात डांबा...! रणदीप हुड्डाचा मायावतींवरचा ‘डर्टी जोक’ ऐकून भडकले युजर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:34 AM2021-05-28T10:34:14+5:302021-05-28T10:34:44+5:30

अभिनेता रणदीप हुड्डाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ समोर येताच लोकांना धक्का बसला आहे.

randeep hooda made derogatory and casteist remark on mayawati twitter trends arrest randeep hooda | याला तुरूंगात डांबा...! रणदीप हुड्डाचा मायावतींवरचा ‘डर्टी जोक’ ऐकून भडकले युजर्स 

याला तुरूंगात डांबा...! रणदीप हुड्डाचा मायावतींवरचा ‘डर्टी जोक’ ऐकून भडकले युजर्स 

googlenewsNext
ठळक मुद्देरणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर अलीकडे तो सलमान खान स्टारर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात दिसला होता. 

बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे वाद ओढवून घेतात. ताजे प्रकरण आहे बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याचे. होय, आता या वादामुळे रणदीपच्या अटकेची मागणी होत आहे. माफी माग, याला अटक करा, अशी मागणी सोशल मीडियावर युजर्स करत आहेत.
या वादाचे कारण ठरला रणदीपचा एक जुना व्हिडीओ. या व्हिडीओत तो उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati)  यांच्याबद्दल अश्लिल विनोद करताना दिसतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांचा संताप अनावर झाला.
हा व्हिडीओ एका इव्हेंटचा आहे. यात रणदीप एक डर्टी जोक ऐकवतो. या जोकमध्ये त्याने जातीवाचक शब्दाचा प्रयोगही केला आहे. (Randeep Hooda pass dirty jock)

रणदीपचा हा व्हिडीओ व्हायरल होताच, मायावतीचे समर्थक भडकले. त्यांनी ट्विटरवर रणदीपला चांगलेच फैलावर घेतले. इतकेच नाही तर त्याच्या अटकेची मागणीही लावून धरली.
रणदीप हुड्डाला अटक करा. एका महिला नेत्याबद्दल इतकी घाणेरडी विचारधारा? असे एका युजरने म्हटले आहे. काहींनी  रणदीपने माफी मागावी, अशी मागणीही यानिमित्ताने केली आहे.

अद्याप रणदीपने याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी कॉमेडियन अबिश मैथ्यूने मायावती यांच्यावर अशीच सेक्सिस्ट कमेंट केली होती. त्यावेळी सुद्धा लोकांना राग अनावर झाला होता. त्यानंतर त्यानेसुद्धा माफी मागितली होती.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतीचे देशभर समर्थक आहेत. ते मायावतींना ‘आयर्न लेडी’ मानतात. अशात रणदीपला त्याचा हा जोक महागात पडू शकतो.
रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर अलीकडे तो सलमान खान स्टारर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात दिसला होता. या चित्रपटातील रणदीपच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते़ यात त्याने ड्रग डिलरची भूमिका साकारली होती़

Web Title: randeep hooda made derogatory and casteist remark on mayawati twitter trends arrest randeep hooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.