रणदीप हुड्डा ‘या’ अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ, आहे कमालीची सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:46 PM2020-03-04T13:46:07+5:302020-03-04T13:47:09+5:30

होय, रणदीप लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

randeep hooda all set to introduce his girlfriend lin laishram to his parents-ram | रणदीप हुड्डा ‘या’ अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ, आहे कमालीची सुंदर

रणदीप हुड्डा ‘या’ अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ, आहे कमालीची सुंदर

googlenewsNext
ठळक मुद्दे2018 मध्ये नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये रणदीप व लिन यांना पहिल्यांदा एकत्र पाहिले गेले होते.

अभिनेता रणदीप हुड्डा याची वेगळी ओळख देण्याची गरज नाही. मान्सून वेडिंग, सरबजीत  ते लाल रंग यासारख्या अनेक चित्रपटातील त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. २००१ मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर २००५ मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही. सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले. अर्थात रणदीप आजही अविवाहित आहे. पण आता मात्र लग्नाची वेळ आलीय. होय, रणदीप लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

 2016 पासून रणदीप एका मणिपुरी मॉडेलला डेट करतोय. या मॉडेलचे नाव आहे लिन लॅशराम. चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या कपलने आता लग्नाचा निर्णय घेतल्याचे कळतेय. लवकरच रणदीप लिनला आपल्या कुटुंबीयांशी भेटवणार आहे

रणदीपची बहीण अंजली आधीच लिनला भेटली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रणदीप गुड न्यूज देणार असे मानले जात आहे.


रणदीपची गर्लफे्रन्ड लिन ही मणिपुरी अभिनेत्री आहे. 2014 मध्ये एका बॉलिवूड सिनेमातही ती झळकली होती. होय, प्रियंका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या सिनेमात तिने काम केले होते. याशिवाय लिन ही नॅशनल लेव्हल आर्चरही आहे.

नशीरूद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रूपमध्ये तिने अनेक वर्षे काम केले. 2018 मध्ये नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये रणदीप व लिन यांना पहिल्यांदा एकत्र पाहिले गेले होते. यानंतर दोघांच्या लव्हलाईफच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Web Title: randeep hooda all set to introduce his girlfriend lin laishram to his parents-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.