ही अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. दीर्घ काळापासून अमिषा बॉलिवूडपासून दूर आहे. अमिषाच्या विरोधात रांचीतील कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे अमिषावर जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. 
बॉलिवूड दिग्दर्शक अजय कुमार सिंग यांनी अभिनेत्री अमिषा पटेलवर अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाकडून अमिषाला समन्स पाठवण्यात आलं होते आणि तिला ८ जुलैपूर्वी न्यायालयासमोर हजेरी लावण्यास सांगितले होते. मात्र अमिषाने याचे काहीच उत्तर दिले नाही.

 
अमिषाच नाही तर तिचा बिझनेस पार्टनर कुणाल गुमरसुद्धा कोर्टात पोहोचले नाही. ज्यानंतर कोर्टाला अजय कुमार सिंग यांचे वकील गोपाळ कृष्ण सिन्हा यांनी दोघांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची विनंती केली. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार लवकरच रांची पोलीस अमिषाला अटक करण्यासाठी मुंबईकडे रवाना होऊ शकतात.  


मागील वर्षी देसी मॅजिक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अमीषाने अजय कुमार सिंग यांच्याकडून पैसे उधार घेतले होते आणि आता तिला या पैशांबद्दल काहीही बोलयचं नाही आहे. 


निर्माता व दिग्दर्शक अजय कुमार सिंग यांच्यानुसार २०१७ साली अमीषासोबत त्यांची भेट झाली आणि यादरम्यान दोघांमध्ये चित्रपटाबाबत चर्चा झाली. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र आर्थिक संकटामुळे हा प्रोजेक्ट मध्येच थांबला होता. त्यामुळे अजय कुमार सिंग अडीच कोटी उधार दिले होते. 


Web Title: Ranchi court issues summon in fraud case against ameesha patel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.