‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार पुढील वर्षाची प्रतीक्षा! हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 11:04 AM2019-04-28T11:04:27+5:302019-04-28T11:04:59+5:30

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Ranbir Kapoor's Brahmastra delayed due to VFX work; may release in Summer 2020 | ‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार पुढील वर्षाची प्रतीक्षा! हे आहे कारण!!

‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार पुढील वर्षाची प्रतीक्षा! हे आहे कारण!!

googlenewsNext

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षी उन्हाळ्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे.
‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने स्वत: ही माहिती दिली. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट २०१९ नाही २०२० मध्ये प्रदशर््ित होईल. चित्रपटातील संपूर्ण टीम आणि व्हीएफएक्स टीम ग्राफिक्स आणि साऊंड्सच्या कामात बिझी आहे. एक शानदार चित्रपट बनवण्यासाठी टीम दिवसरात्र झटते आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी येत्या नाताळची रिलीज डेट पुढे ढकलावी लागतेय. २०२० च्या उन्हाळ्यापर्यंत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू. प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाल्यानंतरच निश्चित रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली जाईल, असे अयानने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.


‘ब्रह्मास्त्र’ यंदा नाताळच्या मुहूर्तावर रिलीज झाला असता तर सलमान खानचा ‘दबंग 3’ आणि अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ या दोन चित्रपटांशी त्याचा बॉक्स आॅफिस संघर्ष अटळ होता. कारण हे दोन्ही चित्रपट २० डिसेंबर आणि २७ डिसेंबरला रिलीज होत आहेत. अशात रणबीरच्या चित्रपटाला मोठे नुकसान सोसावे लागले असते. कदाचित हे नुकसान टाळण्यासाठीही ‘ब्रह्मास्त्र’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली असू शकते.
अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर व आलिया लीड रोलमध्ये आहेत. अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor's Brahmastra delayed due to VFX work; may release in Summer 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.