From Ranbir Kapoor's 'Animal', Sara Ali Khan got the character of Dutch, Lagli | रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधून सारा अली खानला दिला डच्चू, लागली या अभिनेत्रीची वर्णी

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधून सारा अली खानला दिला डच्चू, लागली या अभिनेत्रीची वर्णी

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर कबीर सिंग चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे नाव  आहे 'अ‍ॅनिमल'. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. आता असे वृत्त समोर आले आहे की रणबीर कपूरसोबत या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीला फायनल करण्यात आले आहे.


'फिल्मफेअर'च्या रिपोर्ट्सनुसार, साराच्या हातून काही दिवसांपूर्वी 'हिरोपंती २' हा चित्रपट गेल्यानंतर आता साराला 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातूनदेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आधी साराच्या नावाची अ‍ॅनिमल या चित्रपटासाठी चर्चा होती. पण, तिच्या जागी आता अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची निवड करण्यात आली आहे.


रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्रमुळे चर्चेत आले. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. रणबीर कपूर शेवटचा राजकुमार हिराणीचा चित्रपट संजूमध्ये झळकला होता. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारीत होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.


तर त्याच्या पर्सनल लाइफबद्दल सांगायचे कर तो आलिया भटला डेट करतो आहे आणि लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत. रणबीर आलिया भट आणि फॅमिलीसोबत न्यू इअर साजरा करण्यासाठी रणथंभौरला गेले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: From Ranbir Kapoor's 'Animal', Sara Ali Khan got the character of Dutch, Lagli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.