बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आहे. चाहत्यांना वाटते की आलिया भटसाठी तो खूप सीरियस आहे. एकेकाळी कतरिना कैफच्या प्रेमात रणबीर वेडा होता. रिलेशनशीप आणखी घट्ट करण्यासाठी त्यांनी एकत्र रहायला देखील सुरूवात केली होती. इतकेच नाही तर रणबीरने आपल्या आई वडीलांचे घर सोडले होते. खरेतर त्यावेळी रणबीरने नवीन घर विकत घेतले होते आणि तिथे ते दोघे राहत होते. जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रेम होते, तोपर्यंत ते एकत्र त्या अपार्टमेंटमध्ये राहिले.


ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफने नवीन अपार्टमेंट घेतले आणि ती तिथे राहू लागले. तर रणबीरने हे अपार्टमेंट नुकतेच विकले आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने हे अपार्टमेंट काही महिन्यांपूर्वी विकले आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीतू कपूरने रणबीर कपूरला सक्त ताकीद दिली आहे. यापुढे नवीन अपार्टमेंट विकत घेण्यापूर्वी आई म्हणजे नीता कपूर यांची परवानगी घ्यायची. 

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर रणबीर कपूर लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणबीरचा बेस्ट फ्रेंड अयान मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर व आलिया व्यतिरिक्त मौनी रॉय, अमिताभ बच्चनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर शमशेरा चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, रोनित रॉय व वाणी कपूर मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत.


Web Title: ranbir-kapoor-sold-his-old-apartment-after-months-of-breakup-from-katrina-kaif-read-details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.