Ranbir Kapoor planning to launch his own clothing line in 2020 | आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!
आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!

ठळक मुद्देसध्या रणबीर व आलिया दोघेही अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग करत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण याचदरम्यान एक फक्कड बातमी आहे. होय, रणबीर कपूर लवकरच अभिनयासोबत एक साईड बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे, यात त्याला आलिया भटही मदत करणार आहे. आता रणबीर कुठला साईड बिझनेस करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर सोपे आहे. याआधी अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोराने जे केले तेच रणबीर करणार आहे. म्हणजेच, रणबीर स्वत:ची क्लोदिंग लाईन लॉन्च करणार आहे.


 मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर क्लोदिंग लाईनमध्ये पैसे गुंतवण्याच्या विचारात आहे. तसाही रणबीर त्याच्या फॅशन सेंससाठी ओळखला जातो. त्याची फॅन फॉलोर्इंगही मोठी आहे. अशात हा बिझनेस त्याला त्याच्यासाठी योग्य वाटतोय. अद्याप  रणबीरच्या क्लोदिंग लाइनचे नाव  ठरलेले नाही. पण  २०२० पर्यंत रणबीरच्या क्लोदिंग लाईनची घोषणा होणे अपेक्षित आहे.


यापूर्वी  अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, मलायका अरोरा अशा अनेकींनी स्वत:च्या क्लोदिंग लाइन लॉन्च केल्यात. विशेष म्हणजे, रणबीरची ‘लेडी लव्ह’आलिया भट्ट हिनेही स्वत:ची क्लोदिंग लाइन स्टाइलक्रेकर लॉन्च केला आहे. आता रणबीर कपूर देखील याचाच एक भाग बनणार आहे. साहजिकच आलिया त्याला याकामी मदत करणार आहे.
सध्या रणबीर व आलिया दोघेही अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग करत आहेत.   हा सिनेमा सुपरनॅचरल पॉवरवर आधारित आहे.‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने आलिया आणि रणबीर यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर झळकणार आहे.  


Web Title: Ranbir Kapoor planning to launch his own clothing line in 2020
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.