Brahmastra Logo Launch : कुंभमेळ्यात रंगला आलिया भट्ट- रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा अनोखा सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:19 AM2019-03-05T11:19:19+5:302019-03-05T11:21:11+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.

ranbir kapoor alia bhatt reveal brahmastra logo with flylights | Brahmastra Logo Launch : कुंभमेळ्यात रंगला आलिया भट्ट- रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा अनोखा सोहळा!

Brahmastra Logo Launch : कुंभमेळ्यात रंगला आलिया भट्ट- रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा अनोखा सोहळा!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.  आलियाच्या डोळ्यांत तर अश्रू तरळले. थेट प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित केला गेला. कुंभमेळ्यातील हजारो भाविकांच्या साक्षीने १५० ड्रोनच्या साहाय्याने खुल्या आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित करण्यात आला. आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चे नाव रेखाटले गेले. केवळ इतकेच नाही तर आलिया व रणबीरने चित्रपटात साकारल्या पात्रांची नावेही ड्रोनच्या मदतीने आकाशात कोरली गेलीत. या चित्रपटात आलियाने ईशा नावाचे पात्र साकारले आहे तर रणबीरने शिवा नावाची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे.


रणबीर व आलिया शिवाय ‘ब्रह्मास्त्र’ची अख्खी टीम यावेळी हजर होती. आधी आलिया व रणबीरने पूजा-अर्चा केली आणि यानंतर आकाशात ड्रोनच्या मदतीने ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो रिलीज करण्यात आला. या स्काय शोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धर्मा प्रॉडक्शन, आलिया व रणबीनेही आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. याच व्हिडीओसोबत  ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने इन्स्टाग्रामवर डेब्यू केला.




‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.  )‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.  


  करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक चित्रपट केलेत. या चित्रपटाने त्याची  लव्हरबॉय  ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे. कदाचित म्हणूनचं रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ सारखा चित्रपट साईन केला आहे.

Web Title: ranbir kapoor alia bhatt reveal brahmastra logo with flylights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.