रणबीर-आलिया यांचं नातं आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यांनी त्यांचं नातं सार्वजनिकरित्या जरी कबूल केलेले नसले तरीही गुपचूप गुपचूप प्रेम करणं काही सोडत नाहीत. हे आम्ही असंच नाही तर पुराव्यानिशी बोलतो आहोत. होय, त्याचा पुरावा आहे नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला या रोमँटिक कपलचा फोटो. या फोटोत आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे या फोटो फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यात आलिया रणबीरकडे एकटक बघताना दिसते आहे. ती अत्यंत रोमँटिक नजरेने रणबीरकडे बघत आहे आणि विशेष म्हणजे रणबीरला हे ठाऊकही नाही. पण, हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून चाहत्यांच्या वेगवेगळया प्रतिक्रिया या फोटोला मिळत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कपल एकमेकांसोबतच त्यांच्या फॅमिलीलाही खूप वेळ देताना दिसतात. अलीकडेच हे कपल लंडनला पोहोचले. त्यांनी एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्याचे ठरवले. यावेळी आलियाची बहीण शाहीन देखील त्यांच्यासोबत होती. यादरम्यान अनेक फोटो काढण्यात आले. तसेही सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, एका फोटोची प्रचंड चर्चा झाली. या फोटोचे विशेष काय तर या फोटोवर चाहत्यांच्या तुफान कमेंट्स आल्या. या फोटोत नीतू कपूर यांनी आलियाला स्वत:च्या जवळ ओढून घेतले आहे तर आलिया आनंदित होऊन रणबीरकडे पाहत आहे. या फोटोवरून नीतू कपूर, रणबीर कपूर आणि आलिया यांचा बाँड दिसून येत आहे. 


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी हिंदी चित्रपटात दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Ranbir & Alia's Photo of 'Romantic Couple' went viral on social media !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.