ठळक मुद्देकरिश्मा कपूरने नव्व्दीचा काळ गाजवला होता. तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची बहीण करिनाने देखील बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे.

बॉलिवूडमधील या भावंडांनी आपल्या कलेच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. जाणून घेऊया कोण आहेत ही भावंडं... 

सैफ अली खान आणि सोहा अली खान
सैफ अली खानने नव्वदीच्या दशकात त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तो आजही एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला देत असून त्याच्या सेक्रेड गेम्स 2 ची तर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे तर त्याची बहीण सोहा अली खानने रंग दे बसंती या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

साजिद खान आणि फराह खान
साजिद खानने एक कॉमेडीयन, सूत्रसंचालक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आता दिग्दर्शक म्हणून चांगलेच नाव मिळवले आहे तर फराह खानने कोरिओग्राफीत आपले एक स्थान निर्माण केले. तिला अनेकवेळा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा पुरस्कार मिळाला. तिने ओम शांती ओम, मैं हू ना यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर
अर्जुन हा निर्माते बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे तर जान्हवी ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने एका सख्ख्या भावाप्रमाणे जान्हवी आणि तिची बहीण खूशी यांना सांभाळले. 

काजोल आणि तनिषा
काजोलची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिच्या इतके यश तिची बहीण तनिषाला मिळवता आले नाही. तनिषा बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती.

अमृता अरोरा आणि मलायका अरोरा
मलायकाच्या अनेक आयटम साँगची आजवर चांगलीच चर्चा रंगली आहे. चल छैय्या..., मैं झेंडू बाम... यांसारख्या गाण्यावरील तिच्या नृत्याला प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली. अमृताला मलायका इतके फॅन फॉलोव्हिंग नसले तरी तिने काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ती गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

करिना कपूर आणि करिश्मा कपूर
करिश्मा कपूरने नव्व्दीचा काळ गाजवला होता. तिने दिल तो पागल है, राजा हिंदुस्थानी, बिवी नं 1 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची बहीण करिनाने देखील बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये करिनाची गणना केली जाते.

सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर
सोनम कपूरने गेल्या काही वर्षांत प्रेम रतन धन पायो, संजू, पॅड मॅन या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिची बहीण रियाने खुबसुरत आणि वीरे दी वेडिंग या चित्रपटांची निर्मिती केली आहे तर भाऊ हर्षवर्धन कपूरने मिर्झिया या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी
शिल्पा शेट्टीने बाजीगर, धडकन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून ती नुकतीच सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत झळकली होती. शिल्पाप्रमाणे शमिताला अभिनयक्षेत्रात यश मिळाले नाही. तिने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती.

फरहान अख्तर आणि झोया अख्तर
फरहान हा एक निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, गायक, लेखक असून त्याने या सगळ्याच क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तर त्याची बहीण झोया अख्तर लेखक, दिग्दर्शक असून तिने लक बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, गल्ली बॉय यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

एकता कपूर आणि तुषार कपूर
एकता कपूरला छोट्या पडद्यावरील क्वीन म्हटले जाते. बालाजी टेलिफ्लिम्स या तिच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या अनेक मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तिने त्याचसोबत अनेक हिट चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे तर तुषारने गोलमाल, कुछ तो है, क्या कूल है हम या चित्रपटामध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 


Web Title: Raksha Bandhan 2019: popular siblings in bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.