बाबो !बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केला केला 'कोरोना' व्हायरस संपवल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 12:58 PM2020-02-05T12:58:32+5:302020-02-05T13:23:43+5:30

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.

Rakhi swant said i have removed corona virus from china | बाबो !बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केला केला 'कोरोना' व्हायरस संपवल्याचा दावा

बाबो !बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केला केला 'कोरोना' व्हायरस संपवल्याचा दावा

googlenewsNext

राखी सावंतला ‘ड्रामा क्वीन’ म्हटल्या जाते, ते उगीच नाही. चर्चेत राहण्यासाठी ती रोज नवे कारण शोधतेच शोधते. राखी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. राखीने कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी चीनला जात असल्याचा  व्हिडीओ शेअर केला होता. इथपर्यंत न थांबता राखीने आता कोरोना व्हायरसचा नायनाट केल्याचा दावा केला आहे.

चायनाने हा व्हायरस मारण्यासाठी मला स्पेशल चार्टर्ड पाठवून बोलवले होते. राखीचा या व्हायरसला मारु शकते असा चायनाचे म्हणणे असल्याचे या व्हिडीओत ती बरळत आहे.ऐवढ्यावरच न थांबता ती कोरोना व्हायरस मारण्यात ती यशस्वी झाल्याचे बिनधास्त सांगते आहे. नासाने दिलेला औषधाचा फवारा मी संपूर्ण चीनमध्ये केल्याचे राखी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगते आहे. या व्हिडीओत राखीने स्वत:च्या चेहऱ्याला सुद्धा मास्क लावला आहे. ऐकूणच काय तर हा राखीचा आणखी एक नवा ड्रामा आहे.


काही दिवसांपूर्वी राखीने असाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ‘चाहत्यांनो मी सध्या युकेत आहे आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये परण्याचा निर्णय मी घेतलाय. कारण युकेत माझे अजिबात मन रमत नाही. आईच्या ऑपरेशनसाठी मी मुंबईत आली होती. इथे सगळे चांगले आहे. लंडनची क्वीन माझी फॅन आहे. विमानतळ अगदी घराशेजारी आहे. पण असे सगळे असूनही मी आनंदी नाही. दीपिका पादुकोण, सलमान खान, शाहरूख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अक्षय कुमार, करण जोहर अशा सगळ्यांचे मला रोज कॉल येतात. ते सगळे मला बॉलिवूडमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत. शेवटी मी त्यांचे मनोरंजन करते, असे काय काय राखी या व्हिडीओत बरळताना दिसली होती.

Web Title: Rakhi swant said i have removed corona virus from china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.