राखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:01 AM2019-08-12T11:01:54+5:302019-08-12T11:03:14+5:30

ड्रामा क्चीन राखी सावंत हिच्या लग्नाच्या बातमीने तिचे चाहते आनंदी आहेत. पण एक व्यक्ती मात्र ही बातमी ऐकून प्रचंड संतापली आहे. ही व्यक्ती कोण तर दीपक कलाल.

rakhi sawant shares video of deepak kalal accusing her | राखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर

राखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर

googlenewsNext
ठळक मुद्दे राखी सावंत सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले.

ड्रामा क्चीन राखी सावंत हिच्या लग्नाच्या बातमीने तिचे चाहते आनंदी आहेत. पण एक व्यक्ती मात्र ही बातमी ऐकून प्रचंड संतापली आहे. ही व्यक्ती कोण तर दीपक कलाल. होय, 2018 मध्ये राखीसोबत मिळून लग्नाचा ड्रामा करणारा तोच तो दीपक कलाल. राखीच्या लग्नाच्या बातमीनंतर दीपक कलालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने राखीवर आगपाखड केली आहे.


राखी सावंत हे मंगळसूत्र पाहते आहेस ना. हेच ते मंगळसूत्र, जे संपूर्ण मीडियासमोर तू माझ्या गळ्यात बांधले होतेस आणि आता तू गुपचूप लग्न करून मोकळी झालीस. मी दीपक कलालशी लग्न करणार, असे मीडियासमोर तू म्हणाली होती. मी तुला 4 कोटी रूपये दिलेत. एक एक पैसा मोजून पोत्यात भरभरून दिलेत. ते पैसे तू खाल्लेत की गिळलेत. तू चार दिवसांत माझे पैसे परत केले नाहीस तर मी तुझे आयुष्य उद्धवस्त करेल,’असे दीपक कलाल या व्हिडीओत म्हणातोय.


 या व्हिडीओवर राखीनेही उत्तर दिलेय. ‘आज तू माझ्या पतीविरोधात बोलला. मी एक पतिव्रता आहे. दीपक कलाल तू आत्तापर्यंत माझे चांगले रूप बघितले, माझे काली रूप बघितले नाही. तू पाताळात जा, मी तुला शोधून काढले आणि राधे माँच्या त्रिशूलाने तुझा वध करेल. अब तो मैं तेरा बँड बजाऊंगी,’ असे राखीने म्हटलेय.
दीपकचा हा व्हिडीओ राखीनेही शेअर केला आहे. लोक त्यावर चित्रविचित्र कमेंट्स करत आहेत. तूर्तास हा व्हिडीओही एक ड्रामा आहे, हे सांगायला नकोच.
 राखी सावंत सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले. आधी तिने ही बातमी नाकारली.  माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे. मी त्या हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण  शेवटी लग्न मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली.

Web Title: rakhi sawant shares video of deepak kalal accusing her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.