rakhi sawant shared video in bathtub fan reacted with funny comment on instagram |  मैं बॉलीवुड आ रही हूं...! राखी सावंतचा हा ‘बाथरूम’ व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट 
 मैं बॉलीवुड आ रही हूं...! राखी सावंतचा हा ‘बाथरूम’ व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट 

ठळक मुद्देराखीचा हा व्हिडीओ पाहून लोक थक्क आहेत. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राखी सावंतला ‘ड्रामा क्वीन’ म्हटल्या जाते, ते उगीच नाही. चर्चेत राहण्यासाठी ती रोज नवे कारण शोधतेच शोधते. राखी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. याच माध्यमातून रोज नवा ड्रामा ती रंगवत असते. आता या नव्या व्हिडीओचेच बघा. या नव्या व्हिडीओमुळे राखी जाम चर्चेत आहेत. राखीचा हा व्हिडीओ पाहून हसून हसून पोट दुखेल.
होय, आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवरून राखीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. बाथरूममधील या व्हिडीओत ती बाथटबमध्ये लेटलेली दिसतेय. आपण बॉलिवूडमध्ये परतणार असल्याचे तिने यात म्हटले आहे.


‘चाहत्यांनो मी सध्या युकेत आहे आणि  पुन्हा बॉलिवूडमध्ये परण्याचा निर्णय मी घेतलाय. कारण युकेत माझे अजिबात मन रमत नाही. आईच्या  ऑपरेशनसाठी मी मुंबईत आली होती. इथे सगळे चांगले आहे. लंडनची क्वीन माझी फॅन आहे. विमानतळ अगदी घराशेजारी आहे. पण असे सगळे असूनही मी आनंदी नाही. दीपिका पादुकोण, सलमान खान, शाहरूख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अक्षय कुमार, करण जोहर अशा सगळ्यांचे मला रोज कॉल येतात. ते सगळे मला बॉलिवूडमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत. शेवटी मी त्यांचे मनोरंजन करते, असे काय काय राखी या व्हिडीओत बरळत आहे.


‘मी मुंबईला यावे, असे किती लोकांना वाटते? पण हो, धक्का बुक्की नको. सर्वांना शिव्या देण्याची संधी मिळेल. तसेही तुमच्या शिव्यांमुळे मला काहीही फरक पडत नाही. तुम्ही कितीही शिव्याशाप दिलेत तरीही मी मुंबई आणि बॉलिवूडमध्ये येणार....,’ असेही ती म्हणतेय.
राखीचा हा व्हिडीओ पाहून लोक थक्क आहेत. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी नेहमीप्रमाणे राखीला ट्रोलही केलेय.

Web Title: rakhi sawant shared video in bathtub fan reacted with funny comment on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.