rakhi sawant lies about being in uk caught by fans | चल झूठी...! खोटा ठरला राखी सावंतचा तो दावा, ट्रोल होताच व्हिडीओ केला डिलीट !
चल झूठी...! खोटा ठरला राखी सावंतचा तो दावा, ट्रोल होताच व्हिडीओ केला डिलीट !

ठळक मुद्दे चाहत्यांनी ट्रोल केल्यानंतर राखीने गाजराचा हलवा बनवतानाचा हा व्हिडीओ डिलीट केला.

लग्न केल्याचा दावा करून चर्चेत आलेल्या राखी सावंतच्या पहिल्या ‘करवा चौथ’ने तिच्या लग्नावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. होय, ‘करवा चौथ’च्या दिवशी राखीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती गाजराचा हलवा बनवताना दिसली होती. मी युकेत आहे आणि घरी गाजराचा हलवा बनवतेय, असा दावा राखीने या व्हिडीओत केला होता.
‘हाय फे्रन्ड, ‘करवा चौथ’च्या दिवशी मी गाजराचा हलवा बनवतेय. मी कुठल्या गावात नाही तर युकेमध्ये आहे. मी मनासारखे कपडे घालू शकते. तुम्ही पाहू शकता की, मी कितीसारे बदाम ऑनलाईन ऑर्डर केले आहेत,’ असे राखी या व्हिडीओत बोलताना दिसली होती.

राखीचा हा व्हिडीओ व्हायरल तर झाला पण लोकांनी लगेच राखीची ‘चोरी’ पकडली. होय, युकेत असल्याचा दावा राखीने केला खरा. पण ती ज्या किचनमध्ये हलवा बनवताना दिसली, ते भारतीय किचन होते. या व्हिडीओत भारतीय भांडी, एलपीजी गॅस स्पष्टपणे दिसला. इतकेच नाही तर साडीतील राखीची मेड सुद्धा यात स्पष्ट दिसली. हे सगळे पाहिल्यानंतर राखीचे खोटे लगेच पकडल्या गेले आणि ती सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे प्रचंड ट्रोल झाली.


युकेत भारतीय भांडी, भारतीय मेड, एलपीजी गॅस हे सगळेही मिळते का? असा खोचक प्रश्न अनेकांनी राखीला विचारला. ‘ये भारतवाला युके है क्या?’ असेही अनेकांनी तिला विचारले. चाहत्यांनी ट्रोल केल्यानंतर राखीने गाजराचा हलवा बनवतानाचा हा व्हिडीओ डिलीट केला. यावरून राखी तिच्या पतीला भेटायला युकेला गेलीय, ही गोष्ट धादांत खोटी असल्याचे सिद्ध झाले. असे नसते तर राखीने तो व्हिडीओ डिलीट केलाच नसता.

Web Title: rakhi sawant lies about being in uk caught by fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.