बाथटबमध्ये असलेल्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:15 PM2019-09-30T16:15:05+5:302019-09-30T16:18:14+5:30

बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा फोटो सध्या तिच्या सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

Rakhi Sawant Bathtub Photo Viral On Social Media | बाथटबमध्ये असलेल्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?

बाथटबमध्ये असलेल्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?

googlenewsNext

तिच्या प्रत्येक अदावर सारे लट्टू...... ती कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नाही.... आता हेच पहा..... कधी पाहिलंय का राखीला तुम्ही या अंदाजात....आयटम गर्ल राखी सावंतचा हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ही राखी सावंत असल्याचे कोणीही सांगु शकरणार नाही. कारण राखीचा हा फोटो फेशिअल सर्जरी आधीचा आहे. बाथटबमध्ये  बसून सेक्सी पोज दिलेला हा  फोटो सध्या तिच्या सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

नेहमीच आपल्या बोल्ड अवतारात सा-यांना क्लीन बोल्ड करणारी राखीने या फोटोमुळेही सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोज काही ना काही नौटंकी सुरूच असते. बडी बडी बातें करुन नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी राखी कधी काय करेन याचा नेम नाही. लाइमलाईटमध्ये राहण्यासाठी राखी अनेकदा आटापिटा करताना दिसते. नुकतेच राखीने 28 जुलैला एका पंचताराकित हॉटेलमध्ये मुंबईत गुपचुप लग्न केले. या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते. लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पडला, असे राखीने सांगितले होते. त्यादिवसापासून राखीचं लग्न मिस्ट्री बनून राहिलं आहे. 

 


मात्र राखीची नौटंकी  इथेच थांबली नाही. आता तर ती प्रेग्नंट असल्याचे तिने म्हटले आहे. हा एक फनी व्हिडीओ आहे. यात राखी तिच्या पतीला ती प्रेग्नेंट असल्याचे सांगतेय. यावर तो म्हणतोय हे कसं होऊ शकतं मी तर इंग्लंडला आहे.'' यावर राखी फनी एक्सप्रेशन्स देतेय.  या व्हिडीओत राखीने स्वत: प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला आहे. 

राखी सांगते तिचा पती एनआरआय असून तो खूप स्मार्ट आणि हँडसम आहे.आम्ही लंडनमध्ये नवे घर खरेदी केले आहे. मी स्वयंपाकही शिकले आहे. चपाती आणि भाजीपासून सुरुवात केली,’ असे राखीने सांगितले होते.

Web Title: Rakhi Sawant Bathtub Photo Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.