पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानात राजकुमार झाला सामील, करतोय वंचितांच्या मदतीसाठी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 06:30 PM2019-10-27T18:30:00+5:302019-10-27T18:30:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाअंतर्गत राजकुमार इंडिया वाली दिवाली या दोन मिनिटांच्या जाहिरातीत दिसणार आहे.

Rajkummar Rao is the face of PM Narendra Modi’s India Wali Diwali campaign. Watch video | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानात राजकुमार झाला सामील, करतोय वंचितांच्या मदतीसाठी आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानात राजकुमार झाला सामील, करतोय वंचितांच्या मदतीसाठी आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देराजकुमार रावच्या या व्हिडिओत सुरुवातीला केवळ आपल्याला त्याचा आवाज ऐकायला मिळत आहे. त्यासोबतच छोट्या पडद्यावरील काही कलाकार दिवाळीसाठी गिफ्ट्स पॅक करताना दिसत आहेत.

दिवाळी हा सण सध्या देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. पण पैशांच्या कमतरतेमुळे अनेकांना हा सण चांगल्याप्रकारे साजरा करता येत नाही. हा सण गरिबांनादेखील चांगल्याप्रकारे साकारता यावा त्यासाठी सामान्य लोक, संस्था नेहमीच पुढाकार घेऊन त्यांना मदत करत असतात. अभिनेता राजकुमार राव गरीब मुलांना देखील हा सण चांगल्याप्रकारे साजरी करता यावा यासाठी त्यांना मदत करण्याचे लोकांना आवाहन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाअंतर्गत राजकुमार इंडिया वाली दिवाली या दोन मिनिटांच्या जाहिरातीत दिसणार आहे. त्याची ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ही प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. 

राजकुमारच्या आधी दीपिका पादुकोण भारत की लक्ष्मी या सरकारी अभियानाचा भाग बनली होती. राजकुमार रावच्या या व्हिडिओत सुरुवातीला केवळ आपल्याला त्याचा आवाज ऐकायला मिळत आहे. त्यासोबतच छोट्या पडद्यावरील काही कलाकार दिवाळीसाठी गिफ्ट्स पॅक करताना दिसत आहेत. त्यानंतर तो प्रेक्षकांना आवाहन करताना दिसत आहे की, वंचित असलेल्या मुलांसांठी दिवाळी हा सण खास करण्यासाठी तुम्ही मदत करा... या मुलांसाठी कपडे, खेळणी आणि गिफ्ट्स तुम्ही देखील द्या.. या मुलांकडे पैसे नसल्याने ते स्वतःसाठी वस्तू खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी हा सण आनंदमय बनवूया...
 

Web Title: Rajkummar Rao is the face of PM Narendra Modi’s India Wali Diwali campaign. Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.