राजकुमार हिरानींना 'डायरेक्टर ऑफ द इअर' पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:35 PM2019-04-09T16:35:20+5:302019-04-09T16:49:02+5:30

राजकुमार हिरानी यांच्या 2018मध्ये आलेल्या संजू सिनेमाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. यात रणबीर कपूरने साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे चांगलेच कौतूक झाले.

Rajkumar hirani got director of the year award | राजकुमार हिरानींना 'डायरेक्टर ऑफ द इअर' पुरस्कार प्रदान

राजकुमार हिरानींना 'डायरेक्टर ऑफ द इअर' पुरस्कार प्रदान

googlenewsNext
ठळक मुद्देराजकुमार हिरानी यांना डायरेक्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

राजकुमार हिरानी यांच्या 2018मध्ये आलेल्या संजू सिनेमाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. यात रणबीर कपूरने साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे चांगलेच कौतूक झाले. संजय दत्तच्या कुटुंबीयांनीही राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूरचे आभार मानले.


संजू सिनेमासाठी राजकुमार हिरानी यांना डायरेक्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते राजकुमार हिरानी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजकुमार यांची पत्नीसुद्धा हजर होत्या. 


हा पुरस्कार राजकुमार हिराणी म्हणाले, कलाकाराला तुम्ही कोणत्याही बंधनात अडकवू शकत नाहीत. प्रत्येक कालाकाराची कला हे त्याचे व्यक्त होण्याचे माध्यम असते. कलाकाराला त्याची कला व्यक्त करण्याचे स्वतंत्र्य दिले पाहिजे.   


 यात रणबीरसोबतच विक्की, परेश रावल आणि मनिषा कोईराला यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.संजय दत्तच्या आयुष्यातील विविध पैलू या चित्रपटात उलगडण्यात आले आहेत. काही सीन्स शूट करताना रणबीर कपूर भावूक देखील झाला होता. शूटिंगच्या दरम्यान संजय दत्त स्वत सेटेवर गेला आहे.  रणबीरने ही भूमिका साकारण्यासाठी वजन देखील वाढवले. रणबीरने संजूसाठी घेतलेली मेहनत फळाली आणि रणबीरच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. आपल्या अभिनयच्या जोरावर रणबीरने अनेकांची मनं जिंकली होती.  
 

Web Title: Rajkumar hirani got director of the year award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.