Rajinikanth takes a plump dance drama on the girl's pre-wedding party, see Video | रजनीकांतने मुलगी सौंदर्याच्या प्री-वेडिंग पार्टीत केला धमाकेदार डान्स, पाहा Video
रजनीकांतने मुलगी सौंदर्याच्या प्री-वेडिंग पार्टीत केला धमाकेदार डान्स, पाहा Video

ठळक मुद्देरजनीकांतची मुलगी सौंदर्या आज विशगन वानागमुदीसोबत अडकणार लग्नबेडीत


दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या आज विशगन वानागमुदीसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. नुकतीच त्यांची प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळा पार पडला. त्यावेळी रजनीकांतने धमाकेदार डान्स केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 

सौंदर्याने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत सौंदर्याने ब्लू व गोल्ड रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर विशगनने व्हाइट शर्ट व धोतर नेसले होते. संगीत सेरेमनीमध्ये रजनीकांतने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता आणि त्याची पत्नी लताने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. रजनीकांतची मोठी मुलगी ऐश्वर्या व तिचा नवरा धनुष देखील यावेळी उपस्थित होते. या पार्टीत ओरुवन ओरुवन मुधालली... या गाण्यावर रजनीकांतने दमदार डान्स केला आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, सौंदर्या व विशगन यांचे लग्न पार पडल्यानंतर रजनीकांत घरात पूजा ठेवणार आहे.

सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. सौंदर्याप्रमाणेच तिचा होणारा पती विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाहीत. कनिकाने निर्माता वरूण मनियनसोबत दुसरे लग्न केले आणि विशगनही सौंदयार्सोबत लग्न करण्यास सज्ज आहे. विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. याशिवाय अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. वंजगर उलगम या तामिळ  चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता.
 २०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते. सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले होते.  रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर   दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदर्याने ट्विटरवर जाहीर केले होते.  

English summary :
South superstar Rajinikanth's daughter Saundariya tied a with Vishvan Wanagmudi today. Recently, his pre-wedding party and music festival was over. At that time, Rajinikanth did a dazzling dance. The video of which has become very viral on social media.


Web Title: Rajinikanth takes a plump dance drama on the girl's pre-wedding party, see Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.