रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. रजनीकांत असा अभिनेता आहे जो रुपेरी पडद्यावर काहीही करू शकतो. असं बोललं जातं की जे इतर कुणी करू शकत नाही ते रजनीकांत करू शकतो.रजनीकांत यांनी त्यांच्या चित्रपटात अॅक्शनपासून रोमान्सही केला आहे. रजनीकांत यांच्यासोबत अशा काही अभिनेत्रींनी काम केलं आहे ज्या त्यांच्या मुलीच्या वयाच्या आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्री 

राधिका आपटे


रजनीकांत बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेसोबत कबाली चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात रजनीकांत यांचा स्वॅग पहायला मिळाला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत झळकलेली राधिका त्यांच्यापेक्षा तीस वर्षे लहान आहे.

सोनाक्षी सिन्हा


शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत रजनीकांत यांनी चित्रपट लिंगामध्ये काम केलं आहे. सोनाक्षी रजनीकांत यांच्यापेक्षा ३७ वर्षे लहान आहे.

दीपिका पादुकोण


राधिका आपटे व सोनाक्षी सिन्हा यांच्याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील रजनीकांत यांच्यासोबत काम केलं आहे. ते दोघे कोचाजइयां चित्रपटात झळकले होते. रजनीकांत व दीपिका यांच्यामध्ये ३६ वर्षांचे अंतर आहे.

श्रिया सरन


२००७ साली अभिनेत्री श्रिया सरनला रजनीकांत यांच्यासोबत रोमांस करण्याची संधी मिळाली होती. त्या दोघांनी शिवाजी चित्रपटात काम केले होते. श्रिया त्यावेळी फक्त ३६ वर्षांची होते आणि रजनीकांत ६८ वर्षांचे होते.

मनीषा कोईराला


रजनीकांत आणि मनीषा कोईराला यांनी २००२ साली बाबा आणि इंसानियत का देवता चित्रपटात काम केले होते. मनीषा रजनीकांत यांच्यापेक्षा २० वर्षे लहान आहे.


Web Title: Rajinikanth has had romance with actresses of his daughter's age,Know about these actresses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.