rajinikanth darbar first look poster film title out |  रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक 
 रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक 

ठळक मुद्देरजनीकांत हे ‘मास एंटरटेनर’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटावर लोकांच्या उड्या पडतात.

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. लाइका प्रॉडक्शनने काही क्षणांपूर्वी रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले. या चित्रपटाचे नाव आहे, ‘दरबार’. आधी हा चित्रपट ‘थलाइवा १६७’ या नावाने प्रदर्शित होणार होता. पण नंतर हे नाव बदलून ‘दरबार’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले.
‘दरबार’मध्ये रजनीकांत पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहेत. ‘आप यह फैसला ले सकते हैं कि मैं आपके साथ अच्छा रहूं, बुरा रहूं या बहुत खराब रहूं,’ असे या पोस्टरवर लिहिले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. या चित्रपटातही रजनीकांत यांचे ‘फाडू’ डायलॉग्स ऐकायला मिळणार आहेत. 
ए. आर. मुरूगदास दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. ‘व्हाय दिस कोलावरी’ फेम संगीत दिग्दर्शक रविचंदर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. रजनीकांत या चित्रपटात डबलरोलमध्ये दिसणार असेही कळतेय. एक पोलिस अधिकारी आणि एक सामाजिक कार्यकर्त्या अशी दुहेरी भूमिका ते वठवणार आहेत. ‘दरबार’च्या पोस्टरवरून चित्रपटाच्या कथेबद्दल फार अंदाज बांधता येणार नाही. पण हा चित्रपट मुंबईवर आधारित असल्याचे स्पष्ट होतेय. कारण पोस्टरमध्ये गेट वे आॅफ इंडिया स्पष्टपणे दिसतेय.
रजनीकांत हे ‘मास एंटरटेनर’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटावर लोकांच्या उड्या पडतात. ‘दरबार’ही त्याला अपवाद असणार नाही, असे म्हणायला हरकत नाही. यापूर्वी मुद्रू मुगल, पांडियन, कोडी पराकुत्थु अशा अनेक चित्रपटात त्यांनी पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे.  

Web Title: rajinikanth darbar first look poster film title out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.