Rajinikanth, Akshay Kumar 2.0 Box Office Collection Day 7 | रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी!
रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी!

ठळक मुद्दे३ डी तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट्स, ग्राफिक्स या सर्वांचा चित्रपटात पुरेपुर वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

गत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. होय, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि  अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रदर्शनानंतरच्या सात दिवसांत जगभरात ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.
  ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाच्या कमाईचे आकडे जारी केलेत. रजनीकांत व अक्षयचा हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.याच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी २०.२५ कोटी कमावले. दुस-या दिवशी १८ कोटी, तिस-या दिवशी २५ कोटी, चौथ्या दिवशी ३४ कोटी, पाचव्या दिवशी १३.७५ कोटी, सहाव्या दिवशी ११.५० कोटींचा गल्ला जमवला. तर सातव्या दिवशी ९.५० कोटी कमावले. म्हणजेच ‘2.0’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत एकूण १३२ कोटींचा बिझनेस केला. येत्या वीकेंडमध्ये या कमाईत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.
३ डी तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट्स, ग्राफिक्स या सर्वांचा चित्रपटात पुरेपुर वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचा बजेट ६०० कोटींच्या घरात आहे.  पण बॉक्सआॅफिसवर घोडदौड बघता चित्रपट लवकरच वर्ल्डवाईड ६०० कोटींचा आकडादेखील पार करेल, असे जाणकारांचे मत आहे. ‘2.0’ हा चित्रपट २०१० ला आलेल्या रजनीकांतच्या रोबोट या चित्रपटाचा  सिक्वल आहे.   या चित्रपटाच्या निमित्ताने रजनीकांत आणि अक्षयची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे.

Web Title: Rajinikanth, Akshay Kumar 2.0 Box Office Collection Day 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.