Rajesh Khanna and Anju Mahindru were the reason for this breakup | राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप

राजेश खन्ना हे बॉलिवूडमधील एक सुपरस्टार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील सगळ्यात मोठा सुपरस्टार हरपला अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या होत्या.
राजेश खन्ना यांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. राजेश खन्ना आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू अनेक वर्षं नात्यात होते. ते लग्न करणार असे सगळ्यांना वाटत असताना राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिम्पल कपाडियासोबत लग्न केले. अंजू महिंद्रा आणि राजेश खन्ना यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अंजू महेंद्रूचे करियर संपवण्यासाठी राजेश खन्ना यांनी प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे अंजू यांचे करियर संपवण्यासाठी त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमोर एक अट ठेवली होती, अशी त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. अंजू यांना चित्रपटात कोणत्याही निर्मात्याने अथवा दिग्दर्शकाने संधी दिल्यास त्या चित्रपटाच्या निर्मात्याकडून अथवा दिग्दर्शकाकडून दुप्पट पैसे मी घेणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले असल्याचे म्हटले जाते.
अंजू आणि राजेश खन्ना यांचे अफेअर हे ते दोघे इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनचे होते. ते दोघे शाळेपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. ते एकाच कॉलेजमध्ये शिकले होते. सात वर्षं तरी त्यांचे अफेअर सुरू होते. राजेश खन्ना त्या काळचे सुपरस्टार असल्याने या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. आराधना या चित्रपटानंतर तर राजेश खन्ना यांची पॉप्युलॅरिटी दिवसेंदिवस वाढतच होती. राजेश खन्ना यांना मिळालेल्या या स्टारडममुळे त्यांचे पाय जमिनीवर राहिले नव्हते. आपल्याला मिळालेल्या यशाचा गर्व करू नये असे स्पष्ट मत अंजू यांचे असल्याने त्यांनी ही गोष्ट राजेश खन्ना यांना अनेकवेळा समजावली होती. पण त्यांना ही गोष्ट न पटल्याने त्यांनी अंजूसोबत नाते तोडण्याचे ठरवले. एवढचे नव्हे तर अंजू यांचे करियर संपुष्टात यावे यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले होते. त्या काळात अंजू एका पावडरच्या जाहिरातीत काम करत होत्या. राजेश खन्ना यांच्या ब्रेकअपनंतर या ब्रँडने अचानक अंजू यांना बदलून दुसऱ्या अभिनेत्रीला घेतले होते. तसेच अंजू यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर देखील कमी यायला लागल्या होत्या.

Also Read : या कारणामुळे डिंपल कपाडियाने अक्षय कुमार आणि ट्विंकलच्या लग्नाला दर्शवला होता विरोध,कारण वाचुन तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajesh Khanna and Anju Mahindru were the reason for this breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.