OMG! औकात में रहो, मेरे पती हो... म्हणत शिल्पा शेट्टीने लगावली नवरोबाच्या कानशिलात  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:29 AM2020-03-18T10:29:56+5:302020-03-18T10:31:14+5:30

व्हिडीओ पाहून बसेल धक्का....

raj kundra shilpa shetty chemistry after one million crossed on tik tok-ram | OMG! औकात में रहो, मेरे पती हो... म्हणत शिल्पा शेट्टीने लगावली नवरोबाच्या कानशिलात  

OMG! औकात में रहो, मेरे पती हो... म्हणत शिल्पा शेट्टीने लगावली नवरोबाच्या कानशिलात  

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 15 फेब्रिवारी 2020 ला दुस-यांदा आई-बाबा झाले.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेसच्या चर्चा तर रोज होतात. पण तिचा पती राज कुंद्रा मात्र फार क्वचित चर्चेत येतो. आता मात्र शिल्पासोबत राजही चर्चेत आला आहे. कारण काय तर दोघांचा एक व्हिडीओ. होय, शिल्पा नवरोबाच्या कानशिलात लगावत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. धक्का बसला ना, पण खरे आहे. शिल्पा नव-याच्या कानाखाली मारत असल्याचा व्हिडीओ सध्या जाम चर्चेत आहे.


 व्हिडीओमध्ये राज कुंद्रा ‘न हम अमिताभ, न दिलीप कुमार, न किसी हीरो के बच्चे’ या गाण्यावर डान्स करतोय. डान्स करत असताना अचानक शिल्पा त्या ठिकाणी येते आणि राजच्याच्या कानाखाली वाजवते. एवढेच नाही तर लायकीत राहा, तू माझा नवरा आहेस, असेही ती त्याला बजावते. बिचारा राज यानंतर गाल चोळत बसतो. अर्थात काही वेळात शिल्पा राजला प्रेमाने मिठी मारते.


आता या व्हिडीओचे निमित्त काय, हेही जाणून घ्या. तर राज कुंद्राने टिकटॉकवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण राज मात्र यामुळे जाम खुश आहे. यामुळे खूश होत त्याने शिल्पासोबतचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. 


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 15 फेब्रिवारी 2020 ला दुस-यांदा आई-बाबा झाले. 21 फेब्रुवारीला त्यांनी घरी कन्यारत्न जन्मास आल्याची गुड न्यूज सर्वांना दिली होती. शिल्पाने मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुलीचे नाव समिशा ठेवल्याचेही सांगितले होते. मुलीच्या जन्मासाठी शिल्पाने सरोगसीची मदत घेतली होती. याआधी शिल्पाला विहान नावाचा मुलगा आहे. मुलीच्या जन्मासाठी शिल्पाने सरोगसीची मदत घेतली होती.

  

Web Title: raj kundra shilpa shetty chemistry after one million crossed on tik tok-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.