ठळक मुद्देराधिका लवकरच ‘रात अकेली’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्या हाती ‘लिबरेट- अ कॉल टू स्पाय’ हा हॉलिवूड प्रोजेक्टही आहे.  

अभिनेत्री राधिका आपटे हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राधिकाचा अलीकडे रिलीज झालेला चित्रपट ‘अंधाधुन’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील राधिका व आयुष्यमान खुराणाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. खरे तर ही जोडी आधीच एकत्र येणार होती, पण वाढलेल्या वजनामुळे राधिकाची संधी हुकली आणि तिच्याजागी यामी गौतमची वर्णी लागली. आम्ही कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘विक्की डोनर’ या चित्रपटाबद्दल.


अलीकडे राधिका व आयुष्यमानने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने खुद्द हा खुलासा केला. ‘विक्की डोनर’ हा चित्रपट आधी मला ऑफर झाला होता, असे राधिकाने सांगितले. पण मग ऐनवेळी असे काय झाले की, हा चित्रपट राधिकाला गमवावा लागला? याचे कारणही तिने सांगितले. ती म्हणाली की, ‘मी एक महिना सुट्टीवर गेले होते. तिथे मी मनसोक्त बिअर प्याले. वाट्टेल ते खाल्ले. साहजिकच सुट्टीवरून परतले तेव्हा माझे वजन वाढलेले होते. ‘विक्की डोनर’च्या मेकर्सला ते आवडले नाही. मी वजन कमी करेल, असे मी त्यांना सांगितले. पण ते कुठलाही चान्स घ्यायला तयार नव्हते. आयुष्यमान बारीक होता आणि मी जाड.  त्याची नि माझी जोडी पडद्यावर बैडोल दिसली असती. त्यामुळे ‘विक्की डोनर’ माझ्या हातून गेला.’

‘हा चित्रपट गमावल्यानंतर मी माझ्या डाएटबद्दल एकदम गंभीर झाले. या नकारानंतर मी स्वत:वर लक्ष केंद्रीत केले, ’असेही ती म्हणाली. एकंदर काय तर या एका चित्रपटाने राधिकाला चांगलाच धडा शिकवला. राधिका लवकरच ‘रात अकेली’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्या हाती ‘लिबरेट- अ कॉल टू स्पाय’ हा हॉलिवूड प्रोजेक्टही आहे.  


Web Title: radhika apte reveals she lost out on vicky donor because she was overweight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.