लॉकडाऊनमध्ये राधिका आपटेने हे काय केले, तिच्या चाहत्यांना पडला आहे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:14 PM2020-05-19T15:14:35+5:302020-05-19T15:15:33+5:30

राधिका आपटेने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून लॉकडाऊनमध्ये राधिकाने हे काय केले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे,

Radhika Apte Chops Off Her Hair, And She Looks Even More Gorgeous psc | लॉकडाऊनमध्ये राधिका आपटेने हे काय केले, तिच्या चाहत्यांना पडला आहे प्रश्न

लॉकडाऊनमध्ये राधिका आपटेने हे काय केले, तिच्या चाहत्यांना पडला आहे प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देराधिकाने तिच्या या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा मेकओव्हर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या नव्या लूकमध्ये राधिका खूपच छान दिसतेय असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात असून घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. तसेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. राधिका आपटेने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून लॉकडाऊनमध्ये राधिकाने हे काय केले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

राधिका आपटेच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील नेहमीच कौतुक होते. राधिकाचे केस देखील खूप सुंदर आहेत. पण आता लॉकडाऊनमध्ये चक्क तिने तिचे केस कापले असून मशरूम कट केला आहे. राधिकाने तिच्या या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा मेकओव्हर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या नव्या लूकमध्ये राधिका खूपच छान दिसतेय असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. केवळ एका दिवसांत तिच्या या फोटोला एक लाख ६० हजारांहून लोकांनी लाईक केले असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री राधिका आपटे सध्या कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग नसल्यामुळे नवऱ्यासोबत लंडनला राहात आहे. ती लंडनला जात असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले होते. 

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. राधिका आपटे हिच्या सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली आहे. तिने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

Web Title: Radhika Apte Chops Off Her Hair, And She Looks Even More Gorgeous psc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.