राधिका आपटेनं शेअर केला तिच्या पहिल्या चित्रपटातील लूक, ओळखा पाहू कोणता आहे हा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:30 AM2020-01-30T11:30:42+5:302020-01-30T11:31:10+5:30

ओळखा पाहू, राधिकाचा हा लूक कोणत्या सिनेमातील आहे?

Radhika Aapte shared the look of her first movie, Look What You See? | राधिका आपटेनं शेअर केला तिच्या पहिल्या चित्रपटातील लूक, ओळखा पाहू कोणता आहे हा चित्रपट?

राधिका आपटेनं शेअर केला तिच्या पहिल्या चित्रपटातील लूक, ओळखा पाहू कोणता आहे हा चित्रपट?

googlenewsNext

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. आता राधिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो तिच्या पहिल्या चित्रपटातील आहे.

राधिका आपटे हिने तिच्या पहिल्या चित्रपटातील फोटो शेअर करत म्हटलं की, मी केलेला पहिला चित्रपट. चित्रपटांच्या आठवणी.


राधिका आपटे हिच्या सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे घो मला असला हवा. 


घो मला असला हवा हा चित्रपट २००९ साली रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती केबीसी प्रोडक्शन्सने केली असून या चित्रपटात राधिकाने गावातील सावित्री या महिलेची भूमिका केली होती.


राधिका आपटे हिचा जन्म तमीळनाडूमधील वेल्लूर येथे झाला आहे. राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो.

तिने पुण्यातून तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

Web Title: Radhika Aapte shared the look of her first movie, Look What You See?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.