हे तर कोरोनापेक्षाही भयंकर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आर. माधवनचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:05 PM2021-05-01T18:05:59+5:302021-05-01T18:06:36+5:30

लाखो लोक कोरोना संकटामुळे मरत असताना इतर लोक मात्र ओषधांचाही काळाबाजा करत आहेत.रेमडिसिवीरसारखी इंजेक्शन आणि ऑक्सिजन यातही तिपटीने बाहेर विकत असल्याचे समोर आले आहे.

R Madhavan Get Angary Over Corona Related Drugs Fraud | हे तर कोरोनापेक्षाही भयंकर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आर. माधवनचा संताप

हे तर कोरोनापेक्षाही भयंकर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आर. माधवनचा संताप

googlenewsNext

देश सध्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाला सामोरा जात आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.अशात कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर ओषधांचा तुटवडाही निर्माण झाला आहे. देशात इतकी विदारक परिस्थिती निर्माण झाली असताना काही लोक मात्र ओषधांचा काळाबाजार करत आहेत. लाखो लोक कोरोना संकटामुळे मरत असताना इतर लोक मात्र ओषधांचाही काळाबाजा करत आहेत. रेमडिसिवीरसारखी इंजेक्शन आणि ऑक्सिजन यातही तिपटीने बाहेर विकत असल्याचे समोर आले आहे. खुद्द आर. माधवनने अशा लोकांवर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत नागरिकांना अशा राक्षसापासून सावध राहण्याचेही आवाहन केले आहे.

 

आजारी माणसाला हे सर्व औषधं योग्य वेळी मिळावी यासाठी त्यांचे नातेवाईक सोशल मीडियावरून मदत मागत आहेत. आवश्यक गोष्टी तिपटीने विकत त्यांचा बाजार मांडला आहे. हे खरंच खूप लाजिरवाणं आहे. आर. माधवनने नुसतीच पोस्ट शेअर केली नाही तर त्याचा पुरावाही दिला आहे. अजय अग्रवाल नावाचा व्यक्ती  तीन हजार रुपयामध्ये रेमडेसिवीर औषध विकत आहे.

 

हा तुमच्याकडे आधी पैस्याची मागणी करतो.  पॅन इंडियाच्या माध्यमातून तीन तासांत तुमच्यापर्यंत औषध पोहोचवले जाईल असे सांगतो आणि त्यानंतर तो फोन उचलत नाही. ही व्यक्ती फ्रॉड आहे. हे लोक माझ्यापर्यंतही आले होते. कृपया सावधगिरी बाळगा. आपल्यातच, आपल्या सभोवती असे राक्षस फिरत आहे त्यांच्यापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

कौतुकास्पद! आर. माधवनची पत्नी कोरोना काळात गरीब मुलांचे घेतेय ऑनलाइन क्लास

आर माधवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर माधवनची पत्नी सरिता बिरजे गरीब मुलांना ऑनलाइन शिकवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आर माधवनने लिहिले, 'जेव्हा पत्नी तुम्ही खूपच लहान असल्याची जाणीव करून देते.' या व्हिडिओत आर. माधवन म्हणतोय, 'जेव्हा तुमची पत्नी देशातील गरीब मुलांना ऑनलाइन शिकवत असते आणि तुम्ही काहीच करत नसता.' हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Web Title: R Madhavan Get Angary Over Corona Related Drugs Fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.