पंचेस खाल्लेही अन् दिलेही; फरहान अख्तर अन् राकेश ओमप्रकाश मेहरांनी सांगितली 'तूफान' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:15 PM2021-07-15T12:15:09+5:302021-07-15T12:15:37+5:30

फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर अभिनीत आणि राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तूफान' लवकरच दाखल होणार आहे. या निमित्ताने प्रतिक्षा कुकरेती हिनं घेतलेली मुलाखत....

Punches are eaten and given; Farhan Akhtar and Rakesh Omprakash Mehra told the 'storm' story | पंचेस खाल्लेही अन् दिलेही; फरहान अख्तर अन् राकेश ओमप्रकाश मेहरांनी सांगितली 'तूफान' गोष्ट

पंचेस खाल्लेही अन् दिलेही; फरहान अख्तर अन् राकेश ओमप्रकाश मेहरांनी सांगितली 'तूफान' गोष्ट

googlenewsNext

फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर अभिनीत आणि राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तूफान' लवकरच दाखल होणार आहे. या निमित्ताने प्रतिक्षा कुकरेती हिनं घेतलेली मुलाखत....

फरहान अख्तर
ः तू भाग मिल्खा भाग, रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि त्यानंतर आता तूफान या चित्रपटात काम केले आहेस. तू एखादी भूमिका इतकी सहजतेने कसा काय करतोस?

- मला नेहमीच चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शकाकडून प्रेरणा मिळते. तसेच माझ्या चित्रपटातील इतर सहकलाकारांकडूनसुद्धा मला प्रेरणा मिळत असते. थोडी फार प्रेरणा यातूनही मिळते जेव्हा मी चित्रपट बनवत नसतो आणि फक्त प्रेक्षकांप्रमाणे चित्रपटाचा आस्वाद घेत असतो. मला तेच चित्रपट आठवतात जिथे कलाकारांनी परफॉर्मन्स करताना स्वतःला पूर्णपणे त्या पात्रात सामावून घेतले आहे. ते परफॉर्मन्स जे अगदी मनापासून, प्रामाणिकपणे आणि खरेपणाने सादर केले आहेत. अशा भूमिका नेहमीच अविस्मरणीय ठरतात. याच पद्धतीने काम करण्याचा माझा कल असतो. म्हणजे लोकांना असे वाटले पाहिजे की इतका काळ उलटल्यानंतरही त्याने प्रामाणिकपणे, मनापासून आणि मेहनतीने काम केले आहे. हे कलाकार म्हणून मी समजू शकतो.

मृणाल ठाकूर
ःतू बाटला हाऊस, सुपर ३० चित्रपटात काम केल्यानंतर आता तू तूफानमध्ये दिसणार आहे, या चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल आणि या चित्रपटातील प्रवासाबद्दल सांग ?

- मी तूफानमध्ये साकारलेली अनन्या स्वतंत्र, मनमिळाऊ तरूणी आहे. ती दुःख, वेदनांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. ती कोणावर दबाव आणत नाही मात्र ती त्यांना पर्याय देते. आपल्या जीवनातही दोन पर्याय असतात. पण आपण नेहमीच सोपा मार्ग निवडतो जिथे जास्त मेहनत नसते. तूफानमधील अज्जू भाई रस्त्यावरील मारामारीमध्ये खूप चांगला असतो. तर ती त्याला त्याच्यातील टॅलेंट दाखवून सन्मान मिळेल अशा ठिकाणी काम करण्याचा मार्ग दाखवते. त्याने कधी विचार केलेला नसतो की अज्जू भाई कधी अजीज अली चॅम्पियन बनेल. अनन्या थोडीशी जिद्दी आणि ठाम आहे. तिची इच्छा आहे की अज्जू भाईला थोडा सन्मान मिळावा. वेळ लागेल पण एकना एक दिवस त्याची मेहनत यशस्वी ठरेल. या चित्रपटाची कथा खूपच सुंदर आहे. मला ही भूमिका साकारताना खूप मजा आली. मला या भूमिकेतून खूप काही शिकायला मिळाले. फरहानकडून खूप काही शिकायला मिळाले. तसेच परेश रावल सर तर अभिनयाची संस्था आहेत. त्यांच्यासोबत एक सीन शूट केल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. कारण त्या सीन्सच्या आधी अनन्याच्या या भूमिकेला मी न्याय देऊ शकेन की नाही, याचे दडपण माझ्या मनावर होते. मात्र त्या सीननंतर मी घरी जात असताना माझ्या डोक्यात होते बस्स, हीच अनन्या आहे. जेव्हा आमचे शूटिंग संपले तेव्हा मला खूप दुःख झाले होते कारण मी अनन्याला आताही खूप मिस करते.

राकेश ओमप्रकाश मेहरा
ःतूफान सिनेमासाठी प्रेरणा कुठून मिळाली ?

- या चित्रपटाची कथा हीच खरी चित्रपटाची प्रेरणा आहे. मला आजही आठवते की भाग मिल्खा भागचा आमचा प्रवास खूप चांगला होता. समीक्षकांनी प्रशंसा केली. तसेच बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी ठरला. याशिवाय प्रेक्षकांचे खूप सारे प्रेम मिळाले. आम्ही नेहमीच एकमेकांना आयडिया सांगत होतो. कधी कल्पना चांगल्या वाटत होत्या तर कधी अर्ध्या गोष्टीच चांगल्या वाटायच्या. कधी ऐकायला चांगली वाटायची आणि मग दुसऱ्या दिवशी चांगली नाही वाटायची. याच संदर्भात एक दिवस फरहानचा मला फोन आला की त्याच्या डोक्यात एक विचार आला आहे. त्याने मला १५ ते २० मिनिटांत कथेचा सारांक्ष सांगितला. ते ऐकल्यावर माझ्या मनात आले की आमच्यापुढे ही कथा खूप मोठी आहे. तेव्हा मी फरहानला म्हटले की ही कथा सादर केली पाहिजे. ही कथा माझ्याशी बोलते आहे, असे वाटते आहे. काही सांगण्यासारखे आणि करून दाखवण्यासारखे आहे. कथेला बॉक्सिंगची इतकी चांगली पार्श्वभूमी आहे. चित्रपटात मृणाल आणि फरहानचे नाते खूप छान रेखाटले आहे, तसेच  फरहान आणि परेश रावल यांचा गुरू शिष्य, बाप लेक नाते खूप काही सांगून जाते. प्रेरणेशिवाय फरहान अख्तरसोबत काम करण्याची माझी तहान होती. भाग मिल्खा भाग चित्रपटापासून पुन्हा फरहानसोबत काम करण्याची इच्छा तीव्र झाली होती. ही इच्छा तूफानच्या माध्यमातून पूर्ण होईल असे वाटत होते. पण यानंतरही मला फरहान अख्तरसोबत आणखी काम करायचे आहे.

फरहान अख्तर
ःबॉक्सिंग सीनसाठी तू खूप मेहनत घेतली आहे, बॉक्सिंग करताना तुला थोडेफार पंचेसही खावे लागले, हे खरे आहे का?

- बॉक्सिंग करताना मला पंचेस पडले आणि मीदेखील मारले. जेव्हा मी सराव करत होतो तेव्हा माझ्या प्रशिक्षकाने सांगितले होते की जेवढे शिकायचे तेवढे शिकू जेवढी कोरियोग्राफी करायची आहे तेवढे करू. तयारी बॉक्सिंगची होती तर ठोसा नसता पडला तर जरा विचित्रच वाटले असते. याचा रिझल्ट तुम्हाला स्क्रीनवर पहायला मिळेल.

ःबालपणी तू झोयाचे पंच खाल्ले आहेस, हे खरे आहे का?
- मला झोयाचे पंचेस नाही पडले. उलट मीच चुकून झोयाला एकदा पंच मारला होता. कदाचित मी तेव्हा एक्शनपट पाहिला असेल आणि मी दरवाजा उघडला आणि पंच मारला. नेमकी त्याच वेळेला ती बिचारी रूममधून बाहेर येत होती. तिच्या चेहऱ्याला लागले. त्यानंतर माझी बॉक्सिंगची नाही तर भाग मिल्खा भागची ट्रेनिंग सुरू झाली.

मृणाल ठाकूर
ःतूफान चित्रपटाचा तुझा अनुभव कसा होता?

- माझा चौथा चित्रपट आहे. इतक्या लवकर या सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळेल असे मला वाटले नव्हते. बालपणी मला चित्रपटांपासून लांब ठेवले गेले. टिव्ही पाहण्यासाठी परवानगी नव्हती. आधी आईवडिलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागत होत्या, त्यानंतरच आम्हाला रिमोट मिळायचा. लहान मुलांना ज्या गोष्टीपासून लांब ठेवतो, त्यांना तिच गोष्ट करायची असते. त्यामुळे कदाचित मी या क्षेत्रात आहे. पण मला वाटले की मी खूप मागे आहे. मला बरेच चित्रपट पहायचे आहेत. जेव्हा केव्हा सेटवर आम्ही एकत्र लंच करतो तेव्हा बरेच किस्से ऐकायला मिळतात. त्यांच्या जीवनाबद्दल, करिअरबद्दल आणि सिनेमांबद्दल तेव्हा खूप छान वाटते. कारण पडद्यामागची स्टोरी जास्त अद्बभूत असते. याशिवाय अनन्या जेवढी स्ट्रॉंग दिसते तर कुठेना कुठे माझ्या मनात मी ही भूमिका करू शकेन की नाही असे तूफान सुरू होते. पण मला वाटते की ही माझी ड्रिम टीम आहे. फक्तच कलाकार आणि दिग्दर्शकच नाही तर आमचे डीओपी जय ओझा, साउंड डिझायनर प्रणव शु्क्ला, आमचे कॉश्च्युम डिझाइनर अभिलाषा हे सर्व सेटवरील सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ होते. नेहमी जेव्हा मला वाटायचे की मी हे करू शकणार नाही तेव्हा ते माझ्या आजूबाजूला आधारस्तंभासारखे उभे राहायचे. सांगायचे की मृणाल तू बरेच वर्षे हेच स्वप्न पाहत होते आणि आता हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. तेव्हा तू स्वतःवर अविश्वास दाखवू नकोस. चित्रपटात अनन्या इतकी स्ट्राँग, शक्तिशाली दिसते आहे,याचे सर्व श्रेय या सर्वांना जाते. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असा वाटते की कुठेना कुठे प्रेक्षक अनन्याशी रिलेट करतील. सेटवर आम्ही सगळे एकमेकांसोबत खूप मिळून मिसळून राहत होतो. त्यामुळे एक दुसरे कुटुंबच बनले होते. त्यामुळे गप्पा व्हायच्या. त्यामुळे काम करायला मजा यायची. काम संपवून घरी जाताना चांगले काम केल्याचे समाधान असायचे. तूफानचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.

राकेश ओमप्रकाश मेहरा

ः स्पोर्ट्स ड्रामावर बरेच चित्रपट रिलीज झाले आहेत. तसेच बॉक्सिंगवरही चित्रपट बनले आहेत. तूफान या चित्रपटांपेक्षा किती वेगळा आहे?
- तूफानची कथा ही जीवनापासून प्रेरीत आहे. या चित्रपटातील सर्व पात्रांशी तुम्ही रिलेट कराल. कदाचित तुम्हांला या पात्रांमध्ये तुमची झलक पहायला मिळेल. बॉक्सर म्हणून नाही तर त्याच्या जीवनातील ध्येय, स्वप्ने आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करेल आणि शेवटी प्रेक्षकांना शिकवणही मिळेल.  जीवनात आपल्याला अनेक ठोसे खायला मिळतात आणि आपण त्यात धडपडतो. पण तूफान तेच आहे जे पडून पुन्हा नव्याने उभारी घेतो.  

Web Title: Punches are eaten and given; Farhan Akhtar and Rakesh Omprakash Mehra told the 'storm' story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.