Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:58 PM2019-02-15T18:58:42+5:302019-02-15T19:00:02+5:30

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली  आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत.

Pulwama Attack: Desh Desh for 'Manikarnika', Kangan canceled party | Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी

Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी

googlenewsNext

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.



 

सोशल मीडियावर सेलिब्रेटी मंडळींनीही हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.तर बॉलिवूडची क्वीन कंगणानेही ‘मणिकर्णिका’ची सक्सेस पार्टी रद्द करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली  आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत.



 

 



 



 

Web Title: Pulwama Attack: Desh Desh for 'Manikarnika', Kangan canceled party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.