प्रियंकाचा पती निक जोनासच्या होत्या तब्बल ८ गर्लफ्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 07:00 PM2019-07-28T19:00:00+5:302019-07-28T19:00:00+5:30

निकच्या आयुष्यातही प्रियंकाच्यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ जणींसोबत निकचे अफेअर होते.

Priyanka's husband Nick Jonas had 8 girlfriends, know who she was? | प्रियंकाचा पती निक जोनासच्या होत्या तब्बल ८ गर्लफ्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या?

प्रियंकाचा पती निक जोनासच्या होत्या तब्बल ८ गर्लफ्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या?

googlenewsNext

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा यावर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली आहे. निक व प्रियंका नेहमी फोटोंमुळे चर्चेत असते. निक आणि प्रियांका यांच्या वयात तब्बल ११ वर्षांचे अंतर आहे. निक २६ वर्षांचा तर प्रियांका ३७ वर्षांची आहे. निकपूर्वी प्रियांकाचं नाव असीम मर्चंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा आणि शाहिद कपूरसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकाप्रमाणेच निकच्या आयुष्यातही यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ जणींसोबत निकचे अफेअर होते.
 
मिली सायरस निकची पहिली गर्लफ्रेंड होती. तेव्हा निक फक्त १३ वर्षांचा होता. निक आणि मिलीने २००६ मध्ये एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. दोघं पहिल्यांदा चॅरिटी इव्हेंटमध्ये भेटले होते.

मिलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर २००८ मध्ये निक सेलेना गोमेजच्या प्रेमात पडला. परंतू दोघांचे नाते जास्त काळ टिकले नाही. काही महिन्यांनंतरच २००९ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

निकने फेब्रुवारी २०१२ मध्ये डेल्टा गुड्रमला डेट करत होता आणि तिच्यासोबतही ब्रेकअप झालं.


ओलिविया कल्पोसोबत निक जास्त वेळ रिलेशनशीपमध्ये होता. २०१३ मध्ये त्यांचं नातं सुरु झालं आणि तर २ वर्षांनंतर २०१५ मध्ये ते वेगळे झाले. 


एका न्यूज पोर्टलच्या सुत्रांनुसार निक आणि केंडाल जेफरने २०१५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती.

वयापेक्षा मोठ्या मुलीला डेट करण्याची निकची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१५ मध्ये त्याने आपल्यापेक्षा १४ वर्षे मोठ्या केट हडसनला डेट केलं होतं.

युएस वीकलीच्या रिपोर्टनुसार २०१६ मध्ये निक आणि लिली कोलिन्स एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचे नाते वर्षभरही टिकू शकले नाही.

जॉर्जिया फॉलरला २०१७ साली निक डेट करत असल्याची चर्चा होती.

Web Title: Priyanka's husband Nick Jonas had 8 girlfriends, know who she was?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.