बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राचा देसी गर्लपासून ते हॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रियंकाचे जगभरात असंख्य चाहते असून तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोव्हर्स आहेत. प्रियंकाच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. 

बॉलिवूडमध्ये प्रियंका चोप्राच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. तिथेदेखील तिच्या कामाचं खूप कौतूक झालं. प्रियांकाची एकूण संपत्ती १ अब्ज ९२ कोटी रुपये इतकी आहे. प्रियंकाचे मुंबईत अनेक घरं आहेत. वर्सोवात एका बिल्डिंगमध्ये प्रियांकाची तीन मोठी घरं आहेत. तसेच न्यूयॉर्कमध्ये पेन्ट हाउस आहे. या पेन्ट हाउसची किंमत ३० कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबई आणि गोवात तिच्या नावाने जमीनही आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बागा बीचवरही तिचा एक बंगला आहे, ज्याची किंमत २० कोटी रुपये आहे. 


प्रियांका आणि तिचा नवरा निक जोनासनं बेवरली हिल्सवर एक घर विकत घेतलंय. या घराची किंमत ४४ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय प्रियांकाला २०१४ मध्ये यारी रोडवर एक बंगला विकत घ्यायचा होता. या बंगल्याचं नाव दरिया महल असं आहे. प्रियांका या बंगल्यासाठी १००कोटी रुपयेही मोजायला तयार होती. मात्र काही कारणास्तव हे घर घेता नाही आलं.


डेटिंग अॅप बंबलमध्येही प्रियंकाची गुंतवणूक आहे. याशिवाय तिची स्वतःची पर्पल पेबल ही प्रोडक्शन कंपनीही आहे. तिच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट ही कार आहे. या कारची किंमत ५ कोटी आहे. याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू ५ सीरिज, ऑडी क्यू ७, पॉर्श्च कॅयेन आणि दोन मर्सिडिज कार आहेत. तसंच प्रियांका व निकने नुकतेच मर्सिडिज एस ६५० मायबॅच कार विकत घेतली आहे. 


कारशिवाय प्रियंकाला बाइकचही वेड आहे. २०५ मध्ये प्रियांकाने गुलाबी रंगाची हार्ले डेविडसन बाइक विकत घेतली होती. व्हॅलेंटाइन डेला तिने ही बाइक स्वतःलाच गिफ्ट केली होती. 


प्रियंकाकडे सर्वात कमी किंमतीतले कपडेही ३० ते ५० हजार रुपयांच्या आसपास आहेत. तिला महागड्या बॅग विकत घ्यायलाही आवडतात.

प्रियंकाकडे बोटेगा वेनेटा, टॉड्स आणि फेंडी या ब्रॅण्डच्या चार लाख रुपयांच्या बॅग्स आहेत. 


Web Title: Priyanka Chopra's property and money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.