प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:28 AM2019-11-27T11:28:22+5:302019-11-27T11:28:51+5:30

प्रियंका चोप्राच्या घरी नवा मेंबर आल्यामुळे निक व प्रियंका दोघेही खूप खूश आहेत.

priyanka chopra welcomes new family member in house and created a instagram account | प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स

प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स

googlenewsNext

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या घरी नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे निक जोनस व प्रियंका चोप्रा हे दोघेही खूप खूश आहेत. आता हा नवा मेंबर कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. हा मेंबर म्हणजे त्यांचा नवीन कुत्रा. त्याचं नाव आहे जिनो द जर्मन.

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या कुत्र्याचा फोटो शेअर करत त्याचं स्वागत केलं आहे. या फोटोत कुत्र्यासोबत निक जोनसदेखील दिसतो आहे. तर निकनेही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि सांगितलं की, प्रियंकाने त्याला सकाळी सकाळी सरप्राईज दिलं. हे सरप्राईज प्रियंकाने या कुत्र्यासोबत दिलं आहे.


व्हिडिओमध्ये दिसतंय की प्रियंका नवीन सदस्य म्हणजे कुत्र्याला घेऊन घरात गेली आणि झोपलेल्या निकला उठवलं. त्यामुळे निक थक्क झाला.

यावेळी त्याचा नवीन कुत्रा पण सोबत होता. त्यानंतर निक त्याच्यासोबत खेळू लागला. या कुत्र्याचं घरी आगमन झाल्यानंतर लगेच या कुत्र्याचं इंस्टाग्रामवर अकाउंटदेखील सुरू केलं. इतकंच नाही तर एका दिवसात त्याचे दीड लाखांहून जास्त फॉलोवर्सदेखील झाले.


या अकाउंटवरून आतापर्यंत एका दिवसात तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंना लाखो लोकांनी लाईक केले आहे. याआधीदेखील प्रियंकाकडे एक कुत्री आहे जिचं नाव डायना आहे. प्रियंका जेव्हा न्यूयॉर्कला जाते त्यावेळी तिला डायना कंपनी देते. डायनाला २०१७ मध्ये प्रियंकाने दत्तक घेतले होते. तिचेदेखील इंस्टाग्रामवर अकाउंट असून तिचेदेखील लाखो फॉलोवर्स आहेत.

Web Title: priyanka chopra welcomes new family member in house and created a instagram account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.