ठळक मुद्देप्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात बिझी आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने गेल्या 18 जुलैला आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा प्रियंकाचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी तिचा पती निक जोनासने मोठी पार्टी दिली. पण याचदरम्यान अचानक प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली. याचे कारण म्हणजे, बर्थ डे सेलिब्रेशनदरम्यानचे तिचे फोटो.
होय, या फोटोत प्रियंका तिची आई मधु चोप्रा व पती निक जोनास यांच्यासोबत सिगारेटचे झुरके मारताना दिसतेय. प्रियंकाच्या हातात सिगारेट आहे तर तिच्या आईच्या हातात सिगार आहे. हे फोटो व्हायरल झालेत आणि प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल झाली.

दिवाळीत फटाके न उडवण्याचे आणि अस्थमा असल्याचे सांगणारी प्रियंका आई आणि पतीसोबत सिगारेटचे झुरके घेत आहे, हे पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केले. सिगारेट ओढताना तुला अस्थमा आठवला नाही का? असे एका युजरने तिला सुनावले. तर अनेकांनी यापुढे आम्हाला शिकवू नकोस, अशा शब्दांत फैलावर घेतले.

प्रियंकाच्या बर्थ डेला निकने मियामी बीचवर ग्रॅण्ड पार्टी दिली होती. या पार्टीत प्रियंकाची आई सुद्धा हजर होती. प्रियंकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ‘माझ्या जीवनातील तेजाचा किरण, माझे हृदय, आय लव्ह यू बेबी,’ असे निकने लिहिले होते.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात बिझी आहे. या सिनेमातून तीबॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. निक जोनास याचाही ‘मिड वे’ हा सिनेमा यंदा ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. खुद्द निकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतीच ही माहिती दिली होती.


Web Title: Priyanka chopra spotted smoking with nick jonas mother madhu chopra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.