priyanka chopra praise brother siddharth chopra for his upcoming film khandaani shafakhana | काय म्हणता, प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राही करणार बॉलिवूड एन्ट्री?
काय म्हणता, प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राही करणार बॉलिवूड एन्ट्री?

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले. इशिता कुमार हिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न होणार होते.

प्रियंका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये जम बसवला. आता देसी गर्लचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हाही बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. आता निर्माता म्हणून की अभिनेता म्हणून ते मात्र आम्हाला ठाऊक नाही.
होय, प्रियंकाने आपल्या सोशल अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. पण तिची ही पोस्ट स्वत:बद्दल वा पती निक जोनासबद्दल नसून भाऊ सिद्धार्थ चोप्राबद्दल आहे. प्रियंकाने सोनाक्षी सिन्हा व वरूण शर्मा स्टारर ‘खानदानी शफाखाना’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला आणि  सोबत भाऊ सिद्धार्थचे कौतुक केलेय. 

@Iamsidchopra so happy and proud of the work that you're doing on this film असे तिने लिहिले आहे. तिच्या या पोस्टवरून एक गोष्ट स्पष्ट होतेय, ती म्हणजे प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ या चित्रपटाशी जुळला आहे. पण तो या चित्रपटात अभिनेता म्हणून दिसणार आहे की, निर्माता म्हणून चित्रपटाशी जुळला आहे, हे प्रियंकाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे तूर्तास तरी याबाबत सस्पेन्स कायम आहे.

‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा लीड भूमिकेत आहे. या चित्रपटात रॅपर बादशाह हा सुद्धा एका खास भूमिकेत आहे. शिल्पी दासगुप्ता हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले. इशिता कुमार हिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न होणार होते. पण ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आले. यानंतर अचानक प्रियंकाने आपल्या होणा-या वहिणीला म्हणजे इशिताला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. इशितानेही आपल्या सोशल अकाऊंटवरचे सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केलेत आणि सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुढे हे लग्न तुटल्याची बातमी आली. प्रियंका व सिद्धार्थची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.


Web Title: priyanka chopra praise brother siddharth chopra for his upcoming film khandaani shafakhana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.