ठळक मुद्दे‘इजन्ट इट रोमॅन्टिक’  या चित्रपटात प्रियंका चोप्रा एका योगा अ‍ॅम्बिसीडरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रिबेल विल्सन, लायन हेम्सवर्थ आणि एडम डिवाईनही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

प्रियंका चोप्रा व निक जोनास यांचे लग्न झाले आणि तेव्हापासून हे जोडपे कायम चर्चेत आहेत. आता हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आलेय. होय, सोशल मीडियावर या कपलचा एक व्हिडीओ धूम करतोय. या व्हिडीओत दोघेही एकमेकांचे खुल्लमखुल्ला चुंबन घेताना दिसताहेत.
हा व्हिडीओ आहे, कॅलिफोर्नियातील एका हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरचा. हा हॉलिवूडपट कुणाचा तर खुद्द प्रियंकाचा. प्र्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूडपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रीमिअरला प्रियंका व निकने हजेरी लावली. मग काय, हे कपलच्या रोमान्सने सगळ्यांचे लक्ष वेधले. गर्दीत अनेकांच्या भेटीगाठी घेत असतानाच अचानक प्रियंका व निक यांना प्रेमाचे भरते आले आणि दोघांनीही एकमेकांचे चुंबन घेतले.


‘इजन्ट इट रोमॅन्टिक’  या चित्रपटात प्रियंका चोप्रा एका योगा अ‍ॅम्बिसीडरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रिबेल विल्सन, लायन हेम्सवर्थ आणि एडम डिवाईनही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रियंकाची ‘क्वांटिको’ हीअमेरिकन सीरिज प्रचंड गाजली होती. या शोने प्रियंकाला हॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख दिली.

‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली पीसी आज एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजनविश्वातील प्रियंकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. परदेशात जास्तीत जास्त वेळ व्यतित करणारी देसी गर्ल लवकरच ‘स्काय इज पिंक’या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.  लवकरच प्रियंका मा आनंद शीला यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात दिसणार आहे.

English summary :
'Agent It Romantic' The premiere of a Hollywood movie in California is being displayed soon. During the premier launch priyanka and nick jonas kissed each other.


Web Title: priyanka chopra nick jonas attend the world premiere isnt it romantic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.