ठळक मुद्देप्रियंका हॉलिवूड-बॉलिवूड दोन्हींमध्ये संतुलन राखण्याच्या प्रयत्नात दिसतेयप्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला

प्रियंका चोप्र निक जोनाससोबत सध्या क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा आहे. नुकताच प्रियंकाला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली, आम्ही सध्या या गोष्टीसाठी वेळ घेतोय. काही दिवसांपूर्वीच  प्रियंका चोप्रा पती निक जोनाससह मियामीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करुन आली आहे. प्रियंकाचा जोनास फॅमिलीसोबत डान्स करत असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायर झाला आला होता.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला चार महिने उलटले असूनही यांच्याविषयीच्या चर्चा थांबायला तयार नाहीत. प्रत्येक दिवशी दोघांविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

लग्नानंतर प्रियंका हॉलिवूड-बॉलिवूड दोन्हींमध्ये संतुलन राखण्याच्या प्रयत्नात दिसतेय. काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला.

प्रियंका लवकरच शोनाली बोसच्या 'द स्काई इज पिंक' सिनेमात दिसणार आहे.  या सिनेमा प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.
 


Web Title: Priyanka chopra nick jonas are taking time to have a baby
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.