प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

By अमित इंगोले | Published: October 3, 2020 10:19 AM2020-10-03T10:19:43+5:302020-10-03T10:19:55+5:30

आता प्रियांका चोप्राचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरलं आहे. प्रियांकाने तिचं हे यश फॅन्ससोबत शेअर केलंय.

Priyanka Chopra memoir unfinished becomes best seller in last 12 hours | प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

googlenewsNext

ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच तिचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' प्रकाशित केलंय. सिने विश्वात वेगळी ओळख निर्माण करण्यात तिने जराही कसर सोडली नाही. आता तिचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरलं आहे. प्रियांकाने तिचं हे यश फॅन्ससोबत शेअर केलंय.

प्रियांका चोप्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचं पुस्तक बेस्ट सेलर ठरल्याची माहिती दिली आहे. यूएसच्या टॉप १० बुक्सने लिहिले आहे की, गेल्या २४ तासात यूएसमध्ये बेस्ट सेलर्समध्ये नंबर १ प्रियांका चोप्रा जोनसचं पुस्तक अनफिनिश्ड आहे. याबाबत प्रियांकाने सर्वांचे आभार मानत लिहिले की, 'त्या सर्वांचे आभार ज्यांनी यूएसमध्ये गेल्या २४ तासात माझ्या पुस्तकाला नंबर १ वर पोहोचवलं. आशा आहे की, तुम्हाला पुस्तक आवडलं असेल'. प्रियांकाने या पुस्तकात तिच्या जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टी लिहिल्या आहेत. 

याआधी प्रियांकाने पुस्तकाच्या नावाबाबत एक पोस्ट लिहिली होती. तिने लिहिले होते की, 'अजब बाब आहे. मी या पुस्तकाचं नाव ते लिहिण्याच्या अनेक वर्षांआधी ठरवलं होतं. २० वर्षे एक पब्लिक पर्सन राहिल्यानंतर प्रोफेशनली आणि पर्सनली मी जास्त #Unfinished आहे. हे पुस्तक लिहिण्याची  मजेदार बाब ही आहे की, तुमचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे लिहित असताना मला आढळलं की अनफिनिश्डचा माझ्यासाठी मोठा अर्थ आहे. यात माझ्या आयुष्यातील सामान्य बाबी आहेत'.
 

Web Title: Priyanka Chopra memoir unfinished becomes best seller in last 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.