ठळक मुद्देप्रियंका व निक जोनसने अलीकडे अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे नवीन घर विकत घेतले आहे .

बॉलिवूडमधील देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता ग्लोबल सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच पती निक जोनासमुळेही ती सतत चर्चेत असते. गतवर्षी प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून प्रियंका भारतात कमी अन् अमेरिकेत अधिक राहू लागली आहे. अर्थात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांच्या संपर्कात ती असते. स्वत:चे आणि पतीचे अनेक फोटो ती शेअर करते. पण यावेळी प्रियंकाने असा काही फोटो शेअर केला की, ती चर्चेत आली. होय, प्रियंकाने नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. यात ती, तिची आई मधु चोप्रा व अन्य दोघेजण दिसत आहेत.  हा फोटो शेअर करताना प्रियंकाला तिची एक चूक लक्षात आली नाही. पण नेटक-यांनी मात्र तिची ही चूक अगदी क्षणात पकडली.

होय, फोटोत प्रियंकाच्या एकाच पायात सँडल आहे. दुस-या पायात तिने सँडल घातलीच नव्हती. फोटो काढण्याच्या गडबडीत प्रियंका एका पायात सँडल घालायचे विसरली आणि तिने तसाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोचीच चर्चा सुरु आहे. प्रियंका चप्पल घालायची विसरली की काय? असा प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.
प्रियंका व निक जोनसने अलीकडे अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे नवीन घर विकत घेतले आहे .

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार प्रियंका आणि निकने खरेदी केलेली ही प्रॉपर्टी २०,००० स्क्वेअर फुटांची आहे. ज्यासाठी त्यांना २० मिलियन डॉलर म्हणजेच १४४ कोटी रुपये खर्च करावे लागले. सुत्रांच्या माहितीनुसार निक-प्रियंकाच्या या नव्या घरात ७ बेडरूम, ११ बाथरूम आणि बराच मोठा मोकळा पॅसेज आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra forgot to wear sandal in one leg foot see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.