बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल झालेली पहायला मिळते. कधी कपड्यांमुळे तर कधी फोटोंमुळे ती चर्चेत येते. पुन्हा एकदा ती कपड्यांवरून ट्रोल झाली आहे. असे काय आहे तिच्या कपड्यांमध्ये ज्यामुळे ती ट्रोल झाली असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. या फोटोमध्ये प्रियांकानं काळ्या रंगाचा टॉप व खाकी रंगाची शॉर्ट पॅण्ट घातली होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिला ट्रोल करायला सुरूवात झाली. तिच्या खाकी रंगाच्या शॉर्ट पॅन्टमुळे प्रियंकाला आरएसएसची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हटलं जात आहे. 

प्रियंकाच्या या कपड्यावरून एका युजरनं म्हटलं, प्रियांका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य बनली आहे का? तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, प्रियांका RSSच्या मिटिंगसाठी जात आहे. खाकी पॅन्ट हा आरएसएसचा गणवेश असल्यानं प्रियांकाच्या पॅन्टवरून तिला खूप ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे प्रियंकाच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला. प्रियंका कोणत्याही गेटअपमध्ये स्टायलिश वाटते असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.  


प्रियांका ब्लॅक रंगाचा टॉप व खाकी शॉर्ट पॅण्ट परिधान करून न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर पती निक जोनससोबत फिरताना दिसली. याआधी निक जोनसही लग्नानंतर एअरपोर्टवर खाकी आउटफिटमध्ये दिसला होता आणि त्या ड्रेसमुळे निकला सुद्धा ट्रोल करण्यात आलं होतं.


प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच द स्काई इज पिंक चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी पार पडली.


बऱ्याच कालावधीपासून प्रियंका बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. आता तिला द स्काई इज पिंक चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहे.


Web Title: Priyanka Chopra clips due to troll, trollers and RSS link
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.