priyanka chopra cleared confusion on childhood picture which shared by madhu chopra | OMG!! प्रियंका चोप्राच्या आईने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्युज!
OMG!! प्रियंका चोप्राच्या आईने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्युज!

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले. इशिता कुमार हिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न होणार होते.

येत्या 18 जुलैला प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाला उणेपुरे सहा-सात दिवस उरले असताना प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. पण या पोस्टने केवळ युजर्सलाच नाही तर मीडियालाही कन्फ्युज केले. होय, मधु चोप्रा यांनी एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.  यात मधु चोप्रा यांच्यासोबत एक चिमुकली दिसत आहे.‘बर्थ डे आने वाला है...,’ असे या फोटोसोबत मधु यांनी लिहिले. साहजिकच  यानंतर फोटोतील  चिमुकली दुसरी कुणी नसून प्रियंका असल्याचाच प्रत्येकाचा समज झाला. पण सगळेच चुकले. खुद्द प्रियंकांने कमेंट केल्यावर या पोस्टचे रहस्य उलगडले.


होय, चाहते आणि मीडियाला कन्फ्युज झाल्याचे दिसताच स्वत: प्रियंकाने या फोटोवर कमेंट केली. ‘सिड खूप क्यूट दिसतोय,’ असे तिने लिहिले. तिच्या या कमेंटनंतर मधु चोप्रासोबत असलेली ती चिमुकली नसून चिमुकला अर्थात प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ असल्याचे लोकांना कळले.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले. इशिता कुमार हिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न होणार होते. पण ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आले. यानंतर अचानक प्रियंकाने आपल्या होणा-या वहिणीला म्हणजे इशिताला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. इशितानेही आपल्या सोशल अकाऊंटवरचे सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केलेत आणि सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुढे हे लग्न तुटल्याची बातमी आली. प्रियंका व सिद्धार्थची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
 


Web Title: priyanka chopra cleared confusion on childhood picture which shared by madhu chopra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.